जुळ्या (Twins) मुलांच्या जन्मासंबंधी एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. एका 19 वर्षीय मुलीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे, मात्र या दोन्ही मुलांचे जैविक वडील (Biological Father) वेगवेगळे आहेत. अशी घटना लाखोमध्ये एक अशी आहे. ही 19 वर्षांची तरुणी ब्राझीलमधील (Brazil) मिनेरिओस येथील आहे. मुलीने सांगितले की, तिला तिच्या मुलांचे वडील कोण आहेत हे जाणून घ्यायचे होते म्हणून तिने मुलांची पितृत्व चाचणी केली. या चाचणीमध्ये दोन्ही मुलांचे वडील वेगवेगळे असल्याचे समोर आले आहे.
आपल्या दोन्ही मुलांचे वडील वेगवेगळे असल्याची वस्तुस्थिती समजल्यानंतर या जुळ्या मुलांना जन्म देणारी आईही थक्क झाली. आपल्यासोबत असे काही घडू शकते याचा विचारही तिने कधी केला नव्हता. डॉक्टरांनी सांगितले की, ही विचित्र घटना वैद्यकीय क्षेत्रात क्वचितच पाहायला मिळते.
ब्राझीलमधील या मुलीने एकाच दिवसात दोन पुरुषांसोबत सेक्स केल्यामुळे अशी दुर्मिळ घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर नऊ महिन्यांनंतर तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. जेव्हा या मुलांचा पहिला वाढदिवस जवळ आला तेव्हा ती त्यांच्या वडिलांबद्दल विचार करू लागली व म्हणूनच तिने आपल्या डोक्यातील शंका दूर करण्यासाठी मुलांची पितृत्व चाचणी करण्याचे ठरवले. जी व्यक्ती या मुलांचा वडील असल्याचे तिला वाटत होते त्याच्या डीएनएशी मुलांचा डीएनए जुळवला व त्यामध्ये केवळ एकाच मुलाचा डीएनए जुळत असल्याचे दिसून आले. (हेही वाचा: Live Bomb Inside Body: युक्रेनियन सैनिकाच्या शरीरातून काढला स्फोट न झालेला जिवंत बॉम्ब, पाहा फोटो)
स्थानिक माध्यमांशी बोलताना मुलीने सांगितले की, त्यानंतर त्या दिवशी ज्या दुसऱ्या व्यक्तीशी तिने सेक्स केला होता त्यालाही चाचणीसाठी बोलावले गेले. त्याच्या डीएनएशी दुसऱ्या मुलाचा डीएनए जुळवला असता ती चाचणी सकारात्मक आली. या निकालाने डॉक्टरांसह सर्वजणच आश्चर्यचकित झालो आहेत. सायंटीफिक थिअरी म्हणते की, मासिक पाळीच्या दरम्यान दुसरे स्त्रीबीज सोडले जाते आणि सेक्स दरम्यान ते वेगळ्या व्यक्तीच्या शुक्राणूमध्ये मिसळल्यास असे होऊ शकते. यासाठी शास्त्रज्ञांनी 'हेटेरो पॅरेंटल सुपरफेकंडेशन' (Heteropaternal Superfecundation) ही संज्ञा वापरली आहे.