भारत देशाला अभिजात शास्त्रीय संगीताचा वारसा आहे. पिढयान पिढा तो वारसा पुढे चालवला जात आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल येथील रानू मंडल हीच्या गायकीने सोशल मीडियाला वेड लावलं होतं. संगीतकार हिमेश रेशमिया यांनी तिला बॉलिवूडमध्ये ब्रेकही दिला आता रानू प्रमाणेच एका वृद्ध इसमाच्या शास्त्रीय गायकीने संगीतकार शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांना वेड लावलं आहे. सोशल मीडियामध्ये रस्त्याच्या कडेला शास्त्रीय गायकी पेश करणार्या व्यक्तीचा व्हिडिओ शेअर करत #UndiscoveredWithShankar या हॅशटॅग सह त्यांचा शोध घेण्याचं आवाहन रसिक श्रोत्यांना केलं आहे.
शंकर महादेवन यांनी सोशल मीडियामध्ये हा व्हिडिओ शेअर करताच काही मिनिटांतच त्या व्हिडिओला 10 हजाराहून अधिक लाईक्स आणि शेअर मिळाल्या आहेत. नेटकर्यांनी देखील या व्यक्तीच्या गायकीचं कौतुक केलं आहे.
शंकर महादेवन यांची पोस्ट
'एक प्यार का नगमा है' हे लता मंगेशकर यांचं गाणं गाऊन रानू मंडल ही स्त्री गायिका रातोरात स्टार झाली आहे. काही दिवसांपूर्वी हिमेश रेशमिया या बॉलिवूड संगीतकाराने रानूकडून 'हैप्पी हार्डी और हीर' (Happy Hardy and Heer) सिनेमामध्ये पार्श्वगायन करण्याची संधी दिली आहे.
शंकर महादेवन स्वतः शास्त्रीय गायक आहेत. बॉलिवूड संगीताप्रमाणेच त्यांचा शास्त्रीय गायनाचा दांडगा अभ्यास आणि रियाझ आहे. काही वर्षांपूर्वी मराठी सिनेमा ' कट्यार काळजात घुसली' या सुबोध भावे दिग्दर्शित सिनेमात त्यांनी 'पंडितजी' या शास्त्रीय गायकाची भूमिका बजावली होती. शंकर महादेवन अॅकॅडमीच्या माध्यमातून ते जगभर आबालवृद्धांना संगीताचे धडे देतात.