Scam Alert: कोरोना फंड अंतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून 5000 रूपये दिले जात असल्याचा खोटा मेसेज वायरल; PIB Fact Check ने केला खुलासा
Fact Check | Twitter/PIB Fact Check

भारतामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आता खोट्या बातम्या देखील पसरत आहेत. लॉकडाऊन, कोरोना वायरसची दहशत पाहता जनसामान्यांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी काही समाजकंटक काम करत आहेत. जेव्हापासून कोविड 19 जागतिक महामारी (Coronavirus Pandemic) सुरू झाली आहे तेव्हापासूनच आर्थिक फसवणूक, सायबर क्राईम्सच्या प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे. आता कोरोना फंड अंतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून 5000 रूपये दिले जात असल्याचा खोटा मेसेज वायरल होत आहे. पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check)  कडून त्याच्याबद्दल खुलासा करण्यात आला आहे.

पीआयबी फॅक्ट चेक ने केलेल्या खुलाशानुसार, अशा प्रकारे कोणतीही आर्थिक मदत दिली जात नाही. त्यामुळे यावर विश्वास ठेवू नये. दरम्यान वायरल मेसेज मध्ये नागरिकांना 5000 रूपये मिळवण्यासाठी एका लिंक वर क्लिक करून फॉर्म भरण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र हा मेसेज बनावट असल्याने पीआयबी कडून अशा खोट्या मेसेजेसना फॉर्वर्ड न करण्याचं तसेच संदिग्ध वेबसाईट वर आपली कोणतीही खाजगी माहिती न भरण्याचं आवाहन करण्यात आले आहे. हे देखील नक्की वाचा: Covid-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांना मिळणार 5 लाख रुपयांची आर्थिक मदत; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय.

PIB Fact Check

खाजगी माहितीचा वापर करून आर्थिक फसवणूक होण्याचा, वैयक्तीक माहितीवर डल्ला मारला जाऊ शकतो त्यामुळे ती अनोळखी व्यक्तींसोबत शेअर न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच सरकार कडून किंवा अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध झालेल्याच माहितीवर विश्वास ठेवा. सोशल मीडीयातून तुमच्या पर्यंत येणार्‍या मेसेजची खातरजमा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका.