Ravan Vadh Memes| Photo Credits: Twitter

भारतामध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लोकाग्रहास्तव रामानंद सागर यांची लोकप्रिय पौराणिक मालिका 'रामायण' चं दूरदर्शनवर पुर्नप्रक्षेपण करण्यात आलं. अपेक्षेप्रमाणे 'रामायण' मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळाला. नियमित सकाळी 9 वाजता दाखवल्या जाणार्‍या या मालिकेचा आज (18 एप्रिल) शेवटचा भाग प्रसारित झाला आहे. रामायणातील श्रीराम आणि लंकेश रावाणाच्या युद्धाचा शेवटचा भाग आज प्रक्षेपित करण्यात आला. रावणवधाने संपलेली रामायण मालिका तरूणाईनेही उचलून धरली आहे. आज या रावणवधाच्या एपिसोडवरून देखील सोशल मीडियामध्ये मजेशीर मीम्स पहायला मिळाले आहेत. Uttar Ramayan: 'रामायण' मालिकेचा आजचा शेवटचा एपिसोड, 19 एप्रिल पासून 'लव-कुश' ची कहाणी रंगणार

 

सोशल मीडियावर यापूर्वी भगवान लक्ष्मण आणि कुंभकर्णाचे खास फॅन्स पहायला मिळाले होते. त्यांचे अनेक मजेदार मिम्स सोशल मीडियात भारतीयांच्या लॉकडाऊन मधील परिस्थितीची साधर्म्य साधणारे असल्याने तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान आज श्रीरामांनी रावणाचा वध करून सीतेची सुटका केल्याने सोशल मीडियामध्ये आता रामभक्तांनी पुन्हा दसरा साजरा केला आहे.

रावण वधाचे मजेशीर मिम्स

आज रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेची सांगता झाली आहे. आता उद्यापासून रामायणानंतर उत्तर रामायणाचे एपिसोड्स दाखवले जाणार आहेत. 10 मे पर्यंत सकाळी 9 वाजता नियमित एक नवा एपिसोड दाखवला जाईल. यामध्ये लव कुशची कहाणी पहायला मिळणार आहे.