स्टॉलवरून अंडे चोरणारा पोलिस कॉन्स्टेबल निलंबित; चोरी करतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल, Watch Video
Police constable stealing eggs (PC - Twitter)

पंजाबच्या फतेहगड साहिब जिल्ह्यात तैनात असलेल्या हेड कॉन्स्टेबलला एका हँडकार्टमधून अंडी चोरी केल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे.चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ट्विटर हँडलवरून पंजाब पोलिसांनी प्रीतपाल सिंह म्हणून ओळखल्या जाणार्‍या पोलिस कॉन्स्टेबलच्या निलंबनाची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये असं लिहिलं आहे की, “एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये फतेहगड साहिबचे हेड कॉन्स्टेबल प्रीतपालसिंग हँडकार्टमधून अंडी चोरताना पकडण्यात आले होते. त्यावेळी या रेहडीचा मालक घटनास्थळी नव्हता. या कॉन्स्टेबलने अंडी चोरली आणि ती पँटमध्ये ठेवली. त्याला निलंबित करण्यात आले आहे आणि त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. ”

कॉन्स्टेबलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताचं त्याला ताबडतोब निलंबित करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. एसएसपी अमनीत कोंडल म्हणाले की, कॅमेऱ्यात अंडी चोरताना आढळल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे. अद्याप वाहन मालकाची ओळख पटली नाही आणि अद्यापपर्यंत कोणतीही तक्रार मिळालेली नाही. (वाचा - Viral Video: लुंगीचा 'असा' वापर तुम्ही कधी केला आहात का? व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का)

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पोलिस युनिफॉर्ममध्ये अंडी चोरताना दिसत आहे. संजय त्रिपाठी नावाच्या पत्रकाराने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. 'या चोरीमध्ये मोठा निर्दोषपणा आहे, अन्यथा गणवेश असलेला माणूस असं करत नाही, असं कॅप्शन त्रिपाठी यांनी दिले आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये कॉन्स्टेबल रस्त्यावर उभे असलेल्या एका कार्टला नजरेआड करून खिशात अंडी ठेवताना दिसत आहे. त्याने खिशात एक-एक करून दोन-तीन अंडी ठेवली. स्टॉलचा मालक येण्यापूर्वीचं कॉन्स्टेबल तेथून निघून गेला.