Priyanka Nick Reception Party: प्रियंका-निक रिसेप्शनला PM Modi च्या उपस्थितीनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
प्रियंका-निक रिसेप्शन पार्टीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo credits: Twitter)

Priyanka Nick Reception Party: प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) ही ग्लॅमरस जोडी काही दिवसांपूर्वी विवाहबद्ध झाली. जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर दिल्लीत प्रियंका-निकचे ग्रँड रिसेप्शन (Reception) आयोजित करण्यात आले होते. लग्नातील फोटोज पाहण्यात दंग असतानाच दिल्लीत थाटामाटात रंगलेल्या रिसेप्शन पार्टीचे फोटोज सोशल मीडियावर धडकले. या शाही रिसेप्शन सोहळ्याला अनेक दिग्गज उपस्थित होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हजेरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रियंका-निक रिसेप्शनमधील मोदींचे फोटोज सोशल मीडियावर आले आणि नेटकऱ्यांना खिल्ली उडवण्याची एक संधीच मिळाली. अशी रंगली प्रियंका आणि निकच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी; नरेंद्र मोदींची उपस्थिती ठरली लक्षणीय

आता सध्या प्रियंका-निक लग्न, रिसेप्शनच्या फोटोज पेक्षा नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) हे फोटोज सोशल मीडियावर अधिक व्हायरल होत आहेत. पाहा फनी मीम्सच्या रंगात रंगलेले हे काही खास फोटोज...

नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मोदींची चांगलीच खिल्ली उडवली आहे. यापूर्वीही प्रियंका-निक विवाहसोहळ्यावरही अनेक मीम्स बनविण्यात आले होते. दिल्लीतील ग्रँड रिसेप्शननंतर आता चाहत्यांना प्रियंका-निकच्या मुंबईतील रिसेप्शनच्या फोटोजची उत्सुकता आहे.