प्रियांका चोप्रा आणि निक जोनस (फोटो सौजन्य- People)

First Picture Of Priyanka-Nick Wedding: प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) यांच्या ग्रँड रिसेप्शनपूर्वीच त्यांच्या शाही लग्नसोहळ्याचे फोटो आज सोशल मीडियावर पाहायला मिळाले.तर हे फोटो पीपल (People Magazine) नावाच्या मॅगझीनने खासकरुन इंटरनेटवर व्हायरल केले आहेत.यामध्ये प्रियांका आणि निक यांचे लग्न ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने झाले असल्याचे फोटो समोर आले आहेत.तर हिंदू परंपरेनुसार केलेल्या लग्नसोहळ्यात प्रियांका लाल रंगाच्या जोड्यात दिसून आली तर निक पारंपरिक पद्धतीच्या पोशाखात दिसून आला.

सोशल मीडियावर प्रियांका आणि निकचा ख्रिस्ती पद्धतीमधील लग्नाचा (Christian Wedding) एक फोटो समोर आला आहे. त्यात निक प्रियांकाच्या हाताचे चुंबन घेताना खूप खूश दिसून येत आहे. त्यामुळे हे दोघे परफेक्ट कपल्स (Perfect Couple) असल्याचे दिसले.

1 डिसेंबरला ख्रिस्ती धर्म पद्धतीने लग्न

 

View this post on Instagram

 

And forever starts now... ❤️ @nickjonas

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस या दोघांनी 1 डिसेंबर रोजी ख्रिस्ती धर्म पद्धतीने लग्न केले. तर प्रियांका राल्फ लॉरेनच्या ड्रेस (Ralph Lauren) मध्ये दिसली. तर निकने पर्पल टक्सेडो (Purple Label Tuxedo) या पोशाखात दिसून आला. लग्नापूर्वी या दोघांनी फोटो शूट केले होते. तसेच हा लग्नसोहळा  उमेद भवनच्या बॅक लॉन पार पडला.त्यानंतर एकमेकांच्या घरातील मंडळींनी या दोघांच्या बद्दल आपले मत व्यक्त करत लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. तर लग्नसोहळ्याच्या वेळी खूप आतिशबाजी करण्यात आली.

2 डिसेंबरला हिंदू परंपरेनुसार विवाहबंधन

 

View this post on Instagram

 

And forever starts now... ❤️ @nickjonas

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

प्रियांका आणि निक यांनी 2 डिसेंबर रोजी हिंदू परंपरेनुसार विवाहबंधनात अडकले. तर परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) हिने लग्नावेळी निक जीजूंना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून सर्व तयारी केली होती. तर दुपारी 12 वाजताच्या सुमारास हळद आणि चूडा विधी पार पडल्या. तसेच लग्नाचे ठिकाण हे मेरीगोल्ड (Marigold) या फुलांनी सजविले होते. त्यानंतर प्रियांका चोप्रा डोलीमध्ये बसून लग्नमंडपापर्यंत पोहचल्याचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.