Air Asia Pilot (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) जगभरात झपाट्याने फैलाव होत असल्या कारणाने सर्वजण आपापल्य परीने योग्य ती खबरदारी घेत आहेत. देशात अनेक शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे घराबाहेर जाणे, गर्दी टाळण्याचे आवाहन सरकारकडून नागरिकांना करण्यात येत आहे. दिवसेंदिवस कोरोना ग्रस्तांचा आकडा वाढत चालल्याने नागरिकही भयभीत झाले आहे. या भीतीपायी एअर एशिया पुणे-दिल्ली वैमानिकांनी एक विचित्र गोष्ट केली आहे. या विमानात पहिल्या रांगेत बसलेल्या प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे संशय निर्माण झाल्याने यातील वैमानिकांनी विमानतळावरच इर्मजन्सी द्वारामधून बाहेर पळ काढला.

हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. एअर एशियाच्या पुणे-दिल्ली विमानात पहिल्या रांगेत असलेल्या प्रवासी हा संशयित कोरोना ग्रस्त असल्याचे आढळले. त्यापुढे काय घडले ते या व्हिडिओमध्ये पाहा

हेदेखील वाचा- Coronavirus: महाराष्ट्रात जमावबंदी लागू; आज रात्रीपासून राज्यातील एसटी, बस सेवा बंद; फक्त जीवनावश्यकच गोष्टी चालू

या व्हिडिओमध्ये विमानाचे पायलट इर्मजन्सी गेटमधून बाहेर पडल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून हसावे की काळजी करावी तेच कळत नाहीय. मात्र यावरुन कोरोनाचे भय आता लोकांमध्ये दिसू लागले आहे हे मात्र नक्की.

कोरोनाच्या संक्रमणाचा प्रसार रोखण्याच्या सरकारी आदेशानंतर, देशाची राजधानी दिल्लीतील मध्य दिल्ली, पूर्व दिल्ली, उत्तर दिल्ली, उत्तर पश्चिम दिल्ली, ईशान्य दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पश्चिम दिल्ली यांना बंद केले जाईल. उद्या सकाळी 6 वाजेपासून हा लॉकडाऊनचा आदेश लागू होईल. या आदेशानंतर दिल्लीच्या सर्व सीमा सीलबंद होतील. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले आहे, 23 मार्च 31 मार्चपर्यंत दिल्लीत लॉकडाउन असेल. सार्वजनिक वाहतूक बंद राहील तर फक्त 25 टक्के डीटीसी बसेस धावतील.