आता गॅस सोडल्यानंतर दुर्घंध नाही तर चक्क सुगंध दरवळणार; बाजारात आल्या आहेत गुलाब आणि चॉकलेट फ्लेव्हरमधील Fart Pills
Fart Pills (संग्रहित संपादित प्रतिमा)

प्रत्येकालाच कधी ना कधी गॅसची (Gas) समस्या उद्भवते. काहीजणांना तर बद्धकोष्ठचा (Constipation) कायमच त्रास होत असतो, अशावेळी सर्वात जास्त लाज वाटते जेव्हा तुम्ही गॅस सोडता आणि त्याची दुर्घंधी इतरांपर्यंत पोहचते. मात्र आता या समस्येवर एक जालीम उपाय बाजारात आला आहे. आता जेव्हा तुम्ही गॅस सोडाल तेव्हा दुर्घंध नाही तर चक्क दुघंध दरवळणार आहे. फ्रांसच्या एका कंपनीने अशा प्रकारचे औषध (Fart Pills) बनवले आहे, जे घेतल्यावर तुमची आणि इतरांचीही गॅस च्या दुर्गंधीपासून सुटका होणार आहे.

या औषध निर्मिती मागे ख्रिश्चन पोइन्चेवल (Christian Poincheval – 69) यांचे डोके आहे, ज्यांनी अशा प्रकारच्या गोळ्या आणि पावडर तयार केली आहे. फ्रेंच कंपनी पिलूलपेटने (PilulePet) या गोळ्या 60 च्या पॅकसाठी 20 पौंड इतक्या दराने विकत आहे. कंपनीने दावा केला आहे, या गोळ्या नैसर्गिक घटकांपासून बनविल्या जात असल्याने त्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. प्राण्यांसाठीही तुम्ही हे औषध वापरू शकता. प्राण्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये या गोळ्यांची पावडर मिक्स केल्याने प्राण्यांच्याही गॅस चा वास हा सुगंधामध्ये परावर्तीत होणार आहे. (हेही वाचा: अकाली सुरुकुत्यांनी त्रस्त? या उपायांनी दूर करा वृद्धत्वाच्या खुणा आणि मिळवा नितळ त्वचा)

कंपनी गेली अनेक वर्षे हे औषध तयार करण्याचा प्रयत्न करत होती, अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. सध्या कंपनी गुलाब, चॉकलेट अशा विविध फ्लेवरमध्ये या गोळ्या विकत आहे. कंपनीची वेबसाईट Lutin Malin वर या गोळ्यांची सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या आसपासच्या इतर कोणालाही सुगंधी गॅस हवा असेल तर या गोळ्या ट्राय करू शकता.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)