जर तुमच्या खात्यात अचानक लाखो रुपयांची रक्कम आली तर तुम्ही काय कराल? बहुधा तुम्हाला बँकेला याबाबत कळवणे महत्वाचे वाटेल किंवा लाखो रुपयांच्या लोभाला बळी पडाल. असाच एक प्रकार पेन्सिलवेनिया (Pennsylvania) येथील एका कपल सोबत घडल आहे.
या कपलच्या बँक खात्यात 120,000 डॉलर म्हणजेच जवळजवळ 86 लाख रुपयांची रक्कम अचानक आली होती. मात्र लाखो रुपयांची रक्कम बँक खात्यात आल्याची सूचना पोलिसांना देण्याऐवजी या कपलने ते सर्व पैसे खर्च केले.
मॉन्टोर्सविल येथे राहणाऱ्या रॉबर्ट आणि टिफनी विलियम्स या कपलच्या बँक खात्यात चुकून लाखो रुपये आले होते. ते पैसे कुठून आले किंवा कोणाचे आहेत या बद्दल अधिक माहिती न घेता खर्च ही केले. या खर्च केलेल्या पैशांमधून त्यांनी एक एसयुवी, एक कॅंपर, दोन कार आणि एक कार ट्रेलरसह अन्य काही गोष्टी खरेदी केल्याचे टिफनी विलियम्स हिने एका मुलाखातीत सांगितले.
31 मे रोजी बँकेकडून चुकीचा खाते क्रमांक टाकल्याने 120,000 डॉलर्सची रक्कम यांच्या खात्यात आली होती. मात्र ज्या व्यक्तीने हे पैसे भरण्यासाठी दिले होते त्याचे पैसे खात्यात आली नसल्याची तक्रार बँकेकडे केली असता त्याबाबत अधिक तपास करण्यात आला. त्यामध्ये विलियम्स आणि त्याची पत्नी टिफनी यांच्या संयुक्त खात्यात हे पैसे गेल्याची बाब समोर आली.(कर्नाटक: मित्र-मैत्रिणींसोबत पैज हरल्याकारणाने विवस्त्र होऊन दुचाकी वाहनावरुन रस्त्यावर फिरू लागली तरुणी)
तर सोमवारी कोर्टात हजर झाल्यानंतर यांनी आम्ही दोघांनी काही लोकांकडून चुकीचा सल्ला घेतला असल्याचे म्हटले. मात्र ही चुकीची गोष्ट असल्याचे कपलने मान्य केले. तसेच कपला कोर्टाने 25,000 डॉलर्स जमा करण्यासाठी सांगितले आहेत.