कोणत्याही शुल्लक भांडणाचा शेवट करण्यासाठी, दोघात कोणाच खरं आहे हे जाणून घेण्यासाठी किंवा अगदी टाइमपास करण्यासाठी पैजा लावण्याचे प्रकार सर्रासपणे होताना दिसतात. यात शक्यतो उठाबशा काढणे, पळणे किंवा पैशांची पैज लावणे अशा गोष्टी केल्या जातात इतपत आपण ऐकलंच असेल. पण बेळगांवमध्ये (Belgaum) मात्र एक भयंकर आणि विचित्र असा पैजेचा प्रकार पाहायला मिळाला आहे. आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत लावलेली पैज हरल्यामुळे एका महाविद्यालयीन तरुणीने चक्क विवस्त्र या भागात दुचाकी चालविल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला.
वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार, विवस्त्र अवस्थेत ही तरुणी दुचाकी चालवत असताना अनेकांनी तिचे व्हिडिओ काढले. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. अशा घृणास्पद घटनेची या शहरवासियांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. असा लांछनास्पद प्रकार करणा-या तरुणीला आणि तिला हे करण्यास भरीस पाडणा-यांचा पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा- पुणे: नो-पार्किंग येथे उभ्या केलेल्या वाहनावर पोलिसांची कारवाई, जॅमर काढत तरुणी दुचाकीसह पळाली
झाले असे की, बेळगावमधील एक हॉटेलमध्ये पार्टी सुरु होती. त्यावेळी पार्टीच्या धुंदीत असलेल्या तरुण-तरुणींच्या एका ग्रुपने मस्तीमध्य पैज लावली. ज्यात पैज हरल्यास विवस्त्र होऊन रस्त्यावर वाहन चालविण्याची अट होती. त्यात हरलेल्या तरुणीने विवस्त्र होऊन दुचाकी चालविण्याचा आग्रह धरण्यात आला. त्यानंतर काही वेळातच ही तरुणी आपल्या मित्रासोबत दुचाकीवर स्वार होऊन विवस्त्र अवस्थेत फिरू लागली. मित्राने गाडी थांबवताच ती स्वत: हे वाहन चालवू लागली.
याप्रकरणी पोलिसांनी संबंधित युवतीची चौकशी करुन या किळसवाण्या प्रकारात तिला साथ देणा-या आणि असे करण्यास तिला प्रवृत्त करणा-यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.