पुणे: नो-पार्किंग येथे उभ्या केलेल्या वाहनावर पोलिसांची कारवाई, जॅमर काढत तरुणी दुचाकीसह पळाली
पुणे (Pune) येथे एका नो-पार्किंगच्या ठिकाणी वाहने लावल्याने त्याच्याविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. तसेच वाहतूक पोलिसांच्या नियामांनुसार त्याला जॅमर लावण्यात आला होता
पुणे (Pune) येथे एका नो-पार्किंगच्या ठिकाणी वाहने लावल्याने त्याच्याविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. तसेच वाहतूक पोलिसांच्या नियामांनुसार त्याला जॅमर लावण्यात आला होता. तर पोलिसांनी वाहनावरु केलेल्या कारवाईत एका तरुणीची दुचाकी सुद्धा होती. त्यामुळे तरुणीने शक्कल लढवत गाडीची हवा न काढता चक्क जॅमरच काढला असल्याचा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी वाहतूक नियमांअंतर्गत नो-पार्किंगमधील दुचाकीला जॅमर लावला. परंतु तरुणीला हे कळल्यावर तिने पोलीस दुसऱ्या कामात व्यस्त असताना हुशारीने तिच्या दुचाकीला लावलेला जॅमर काढला आणि त्या ठिकाणाहून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी दामिनी पथकाशी संपर्क साधत या मुलींविषयी अधिक माहिती मिळवली. तर एका ठिकाणी गाडीमध्ये हवा भरण्यासाठी आल्या असल्याची माहिती दामिनी पथकाने पोलिसांनी दिली.
(शिर्डी: Tik Tok चा आणखीन एक बळी, व्हिडीओ बनवताना चुकून गोळी चालवली गेल्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू)
त्यानुसार पोलिसांनी या मुलींना शोधून काढले. तसेच तरुणीच्या विरोधात कारवाई करत दंड वसूल केला. त्याचसोबत तरुणीला अशा प्रकारचे कृत्य केल्यामुळे समजसुद्धआ पोलिसांकडून देण्यात आली.
(The above story first appeared on LatestLY on Jun 14, 2019 03:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

