(Photo Credits: Wikipedia, Pixabay)

अहमदनगर: टिक टॉक (Tik Tok)  या सोशल मीडिया ऍपसाठीचं भारतीयांचं वेड हे काही नवीन सांगायला नको, एका व्हिडीओ वर लाईक्स मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांतून अनेकांची आयुष्य घडली आहेत तर अनेकांना आपलं आयुष्य गमवावं लागलं आहे.असाच काहीसा प्रसंग अहमदनगर (Ahmednagar) मधील प्रसिद्ध देवस्थान शिर्डी (Shirdi) येथे अलीकडे पाह्यला मिळाला. टिक टॉक वर आपल्या परिवारातील सदस्यांसोबत व्हिडीओ बनवत असताना 17 वर्षीय प्रतीक वाडेकर (Pratik Wadekar)  ला आपले प्राण गमवावे लागले. प्रतीक आणि कुटुंबातील अन्य दोघे जण हे एक देशी बंदूक घेऊन व्हिडीओ बनवत होते मात्र उत्साहाच्या नादात या बंदुकीचे ट्रीगर खरोखरच दाबले गेले आणि मग जे घडलं त्यामुळे आता वाडेकर कुटुंबियांवर पश्चाताप व दुःखाची कळा पसरली आहे.

ANI ट्विट

मृत प्रतीक हा आपल्या कुटुंबियांसोबत एका नातेवाईकाच्या अंतिम कार्यासाठी शिर्डीला आला होता. हा कार्यक्रम आटोपल्यावर तो आपले अन्य दोन नातेवाईक सनी पवार (वयवर्षे ११) व नितीन वाडेकर यांच्यासोबत हॉटेल रूम मध्ये बसला होता.तेव्हा या सर्वांनी आपण टिक टॉक व्हिडीओ बनवू असे ठरवले यापैकी एकाने आपल्यासोबत देशी बंदूक आणली होती त्यामुळे आता बंदुकीला घेऊनच व्हिडीओ बनवू असा या तिघांचा प्लॅन ठरला. ठरल्याप्रमाणे शूटिंग करत असताना अचानक त्यापैकी एकाच्या हाताने बंदुकीचा ट्रीगर दाबला गेला आणि ती गोळी प्रतीकला लागली. यानंतर घाबरलेले अन्य दोघे रूममधून पळून जायला लागले पण गोळीचा आवाज ऐकून आलेल्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले पण मग त्यांनाही बंदुकीचा धाक दहवून सनी आणि नितीन फरार झाले. मोहित मोर, Tik Tok स्टारची दिल्ली मध्ये गोळ्या झाडून निर्घुण हत्या

या प्रसंगाची माहिती मिळताच सनी ला तातडीने सरकारी रुग्णालयात नेण्यात आले पण तिथे पोहचताच त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी सनी आणि नितीन यांना ताब्यात घेतले आहे मात्र अन्य कुटुंबिया अद्याप फरार आहेत. या दोघांवर आयपीसी कलम ३०२ (खून) व ३०७ (खुनांचा प्रयत्न) याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.