
दिल्ली (Delhi) येथे प्रसिद्ध टिक टॉक स्टार (Tik Tok Starr) मोहित मोर (Mohit Mor) याच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार करत निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी हल्लेखोरांचा शोध पोलिसांकडून घेतला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
मोहित मोर हा टिक टॉकवर प्रसिद्ध स्टार असून त्याचे पाच लाखापर्यंत फोलोअर्स आहेत. त्याचसोबत मोहित हा एका जिममध्ये ट्रेनरसुद्धा आहे. परंतु मंगळवारी (21मे) संध्याकाळच्या वेळी त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी फोटो स्टेटच्या दुकानात गेला असता तेथे काही हल्लेखोरांनी डोक्यात हेल्मेट घातलेल्या अवस्थेत त्याच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. हे प्रकरण एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा दिसून आले असून त्यामध्ये हल्लेखोर पळ काढताना दिसून येत आहेत. तर ही हत्या परस्पर संघर्षातून केली असल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.(Tik Tok पुन्हा वादात, जामा मशिदीत डान्स व्हिडीओ बनवल्याने यापुढे केवळ प्रार्थनेसाठीच मिळणार प्रवेश)
सोशल मीडियावर मोहितचे खुप फॅनफोलोअर्स आहेत. तसेच मोहित हा त्याच्या कुटुंबासह हरियाणा येथे राहत होता. मात्र वडिलांचा मृत्यू झाला असून कुटुंबात मोठा भाऊ आणि आईसोबत तो राहायचा. तसेच मोहित याची प्रसिद्धी पाहून तो राहत असलेल्या परिसरात त्याच्याबद्दल द्वेष होता.