Jama Masjid Bans Tourist: टिक टॉक (TikTok) वरील बंदी हटवल्यास काही दिवस न होतात इतक्यात एका व्हायरल व्हिडिओमुळे पुन्हा एकदा हा ऍप चर्चेत आला आहे. जामा मशिदीत (Jama Masjid) डान्स करणाऱ्या दोन परदेशी मुलींचा टिकटॉक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल(Viral Video) होतोय, मात्र मुस्लिम बांधवांच्या प्रार्थनेच्या पवित्र ठिकाणी केलेला हा डान्स पाहून एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. अनेकदा अशा सार्वजनिक ठिकाणी बेभान टिकटॉक वेडे व्हिडीओ बनवताना पाहायला मिळतात यावर निर्बंध लावण्यासाठी जामा मशिदीने हे पाउल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
जामा मशिदीत डान्स करणाऱ्या पर्यटंकाचा व्हिडीओ (Watch Video)
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर काहीच तासात जामा मशीद समितीने मशिदीबाहेर एक बोर्ड लावला ज्यानुसार पर्यटकांना आतमध्ये प्रवेशास मज्जाव घालण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जामा मशिदीत जाण्यासाठी एकूण सात गेट आहेत, त्यापैकी 6 गेट पर्यंटकांसाठी बंद केले असून तूर्तास एकाच मोठ्या गेटमधून पर्यटकांना आत पाठवण्यात येत आहे हे पाऊल त्यांच्या सुरक्षेसाठीच उचलण्यात आले असल्याचे जामा मशिदीच्या समितीने सांगितले.याशिवाय मशिदीच्या सभागृहात नमाजासाठी जाण्यावर कोणतेही बंधन नसून अशा प्रकारे कोणालाही मशिदीत प्रवेश नाकारलेला नसल्याची देखील समितीकडून सांगण्यात येत आहे. All about TikTok: तुम्हीपण 'टिक टॉक' Video बनवता? मग आगोदर वयाचा अंदाज घ्या
पर्यटकांना प्रवेश नाकारल्याच्या मुद्द्यावरून जामा मशिदीत वाद सुरु असतानाच सोशल मीडियावर या व्हिडीओ साठी दुहेरी प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींच्या मते या मुलींना मशिदीच्या आवरात व्हिडीओ बनवण्यापासून रोखले नाही ही मशिदीच्या प्रशासनाची चूक आहे असे म्हंटले जातेय यावर हे व्हिडीओ बरेच जुने असल्याचे मशिदीच्या समितीने सांगितले आहे. या वादात काहींनी या मुलींची बाजू घेत मशिदीच्या निर्णयाचा निषेध केला आहे.