धक्कादायक! पाकिस्तानची लोकप्रिय TikTok स्टार हरीम शाहचा मॉलमध्ये जमावाकडून विनयभंग; पाहुणी म्हणून बोलावल्यावर लाथा बुक्क्यांनी मारहाण (Video)
हरीम शाहचा विनयभंग (Photo Credit : Twitter)

नुकतेच दुबईतील (Dubai) मॉलच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिलेली, पाकिस्तानची टिकटॉक स्टार हरीम शाह (Hareem Shah) हिचा विनयभंग झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना हरीमने याबाबतचा आपला संताप व्यक्त केला आहे. सोबतच स्त्रियांशी असे वागतात का? असा सवालही तिने उपस्थित केला आहे. काही काळापूर्वी परराष्ट्र कार्यालयात टिकटॉक व्हिडिओ बनवल्यामुळे हरीम चर्चेत आली होती. घडलेल्या घटनेबद्दल काही सोशल मीडिया युजर्सनी सहानुभूती व्यक्त केली आहे, तर काही लोकांनी हरीमची चेष्टा केली आहे.

हरीमने शेअर केलेला व्हिडीओ -

या बाबत माहिती देताना हरीम म्हणते, ‘दुबईच्या ओएसिस मॉलच्या उद्घाटन प्रसंगी मला पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. तिथे शेकडो पाकिस्तानी तरुणांनी मला ढकलले, शिवीगाळ केली आणि काहींनी तर मला लाथा मारल्या. स्त्रियांशी वागण्याची ही पद्धत आहे?’ सोबत तिने या घटनेचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे. घडलेल्या घटनेबाबत हरीम म्हणते, ‘जे घडले ते अतिशय वाईट होते, कोणतीही महिला असे वागणे सहन करणार नाही. महत्वाचे म्हणजे पाकिस्तानमध्ये अशा गोष्टींसाठी कोणताही कायदा नाही.’ (हेही वाचा: पुणे: शाळेबाहेर थांबून सतत विद्यार्थीनींचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला अटक)

फोटो घेण्याच्या बहाण्याने हरीमचा विनयभंग -

यापूर्वीही हरीम विनयभंगाची शिकार ठरली आहे. एका कार्यक्रमादरम्यान हरिमसोबत फोटो घेण्याच्या बहाण्याने काही तरुणांनी तिला वेढले होते. हरीमने दिलेल्या माहितीनुसार, एका युवकाने तिचा हात धरला आणि तीच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. सुमारे दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या कक्षात टिकटॉक व्हिडिओ बनवल्यामुळे हरीम वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या विषयावर जोरदार चर्चा झाली आणि तिला अशा ठिकाणी टिकटॉक व्हिडिओसाठी परवानगी मिळालीच कशी? उस प्रश्न उभा राहिला.