भारताच्या संसदेमध्ये काल (11 डिसेंबर) रात्री नागरिकत्व सुधारणा विधेयक (Citizenship Amendment Bill) मंजूर झाल्यानंतर देशात संमिश्र प्रतिसाद मिळत आहेत. एकीकडे ईशान्य भारत धुमसत आहे. पण दिल्लीतील मजनू का टीला परिसरामध्ये पाकिस्तानामधून आलेल्या हिंदू कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या मंजूरीनंतर आनंदीत झालेल्या कुटुंबाने त्यांच्या घरातील चिमुकलीचं नाव 'नागरिकता' (Nagrikta) असं ठेवलं आहे. लोकसभेमध्ये विधेयक मंजूर झाल्यानंतर हे नाव ठेवण्यात आलं आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आयपीएस अधिकारी अब्दुर रहमान यांचा राजीनामा.
मजनू का टीला भागात राहणार्या अनेक शरणार्थींनी विधेयक मंजूर झाल्यानंतर फटाके वाजवून, मिठाई वाटप केलं. दरम्यान सध्या हे विधेयक मंजूर झाल्यानंतर ईशान्य भारतामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. कर्फ्यू लावण्यात आला आहे तर तणावाग्रस्त स्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून लष्कर तैनात करण्यात आलं आहे.