केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. आपल्या मनात जे आहे ते स्पष्टपणे बोलणे हा नितीन गडकरी यांचा स्वभाव. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या भाषणात ते काय बोलणार याबाबत अनेकांना उत्सुकता असते. अनेकदा त्यांच्या भाषणातील त्यांची वक्तव्ये प्रसारमाध्यमांतून आणि सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरतात. नितीन गडकरी (Nitin Gadkari Funny Speech Video) यांचा असाच एका कोणत्यातरी भाषणातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हडिओत ते विनोदी कवी शरद जोशी (Sharad Joshi) यांच्या कवीतेचा दाखला देत भारतीय राजकारणातील वास्तव सांगत आहेत. गडकरी यांचा व्हिडिओ नेमको कुठला आहे ह समजू शकले नाही. परंतू, एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर हँडलवरुन तो शेअर केला आहे.
भारतीय राजकारणातील नेत्यांची अतृप्त अवस्था कशी असते हे नितनी गडकरी आपल्या भाषणा सांगत असल्याचे या व्हिडिओत दिसते. त्यासाठी ते हास्यकवी शरद जोशी यांच्या एका कवीतेचा आधार घेऊन सांगतात. जो नेता असतो त्याला आमदार व्हायचे असते, जो आमदार आहे त्याला मंत्री व्हायचे असते आणि जो मंत्री असतो त्याला मुख्यमंत्री व्हायचे असते. पण हे सगळे लोक असमाधानी असतात. आमदाराला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून तो असमाधानी असतो. मंत्र्याला मुख्यमंत्री पद मिळाले म्हणून तो असमाधानी असतो. तर मुख्यमंत्री मिळालेली खुर्ची किती दिवस टिकेल या भीतीने असमाधानी असतो, असे गडकरी सांगतात. गडकरी यांच्या या वास्तवावर उपस्थितही दाद देऊन हसताना व्हडिओत दिसतात. (हेही वाचा, Maharashtra: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लिहलेल्या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया)
नितीन गडकरी व्हिडिओ
#WATCH | MLAs weren't happy as they couldn't become ministers, ministers were unhappy as they couldn't get good depts, those with good depts were unhappy as they couldn't become CM&CM is worried as he/she doesn't know for how long they'll continue: Union Min Nitin Gadkari (13.09) pic.twitter.com/83IfiqGDK4
— ANI (@ANI) September 14, 2021
नितीन गडकरी यांची अनेक विधाने या आधीही जोरदार चर्चेत आली होती. एकदा त्यांनी जाहीर भाषणांतून भाजप कार्यकर्त्यांना फटकारले होते. भाजप नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची सध्याची अवस्था म्हणजे चहापेक्षा किटली गरम अशी झाली आहे असे गडकरी म्हणाले होते. तर एका ठिकाणी भाजप हा हवेवर चालणारा पक्ष आहे. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा होती. जे लोक ग्रामपंचायत निवडणुकीलाही निवडूण येणार नाहीत ते लोक नरेंद्र मोदी यांच्या हवेवर खासदार झाले, असा टोला गडकरी यांनी लगावला होता. गडकरी यांचे हे विधान तेव्हा चांगलेच चर्चेत आले होते