Maharashtra: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लिहलेल्या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया
CM Uddhav Thackeray, Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रातील (Maharashtra) राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याचे तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. तसेच त्यांनी काम थाबण्याचाही इशारा दिला होता. नितीन गडकरी यांच्या पत्रामुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, राज्यातील कोणत्याही विकास कामात कोणलाही आड येऊ देणार नाही, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना दिले आहे. नागपूर मेट्रो स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी गडकरींना ग्वाही देखील दिली आहे.

नितीन गडकरी यांनी लिहलेल्या पत्रावर उद्धव ठाकरे म्हणाले की, नितीनजी तुम्ही फार प्रेमात बोलता, पण कठोर लिहता. तुमचे आणि आमचे नाते फार वेगळे आहे. तुम्हीही कर्तव्यकठोर आहात, आम्हीही कर्तव्यकठोर आहोत. ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे, ती आपणही घेतली आहे. ज्यात जनतेशी गद्दारी करायची नाही, त्यांचा विश्वास घात करायचा नाही, तसेच जनतेच्या कामात अडथळा आणायचा नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच राज्यातील कोणत्याही विकास कामात आड येऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. हे देखील वाचा- Maharashtra: जातीवादीच्या मुद्द्यावरून मनसे- राष्ट्रवादीत संघर्ष पेटला, शरद पवार यांच्या टीकेला राज ठाकरे यांचे प्रत्युत्तर

नितीन गडकरी यांनी पत्राद्वारे काय म्हटले?

राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शिवसेना नेते आणि कार्यकर्ते अडथळ आणत आहेत. राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांत तीन ठिकाणी नियमबाह्य कामांसाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांना त्रास दिला जात आहे, यामुळे काम बंद पडण्यापर्यंत परिस्थिती गेली आहे. हे असेच सुरु राहिले तर, राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्याबाबात विचार करावा लागेल, असा गंभीर इशारा नितीन गडकरी यांनी पत्रातून दिला.

नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रावर भाजपच्या नेत्यांनी समर्थन केले आहे. तर, महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीकास्त्र सोडले आहे. महत्वाचे म्हणजे, नितीन गडकरी यांच्या पत्रावर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.