सरोजिनी नायडू (Sarojini Naidu) भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रमुख नेत्यांपैकी एक महिला नेत्या. ज्यांना 'भारताच्या नाइटिंगेल' (Nightingale of India) म्हणून ओळखले जाते. याच सरोजिनी नायडू यांनी 95 वर्षांपूर्वी म्हणजेच साधारण 1928 मध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा दौरा केला होता. त्यांच्या या दौऱ्यातील एका भाषणाचा (Sarojini Naidu Speech)व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही. परंतू, हा व्हिडिओ अनेकांचे लक्ष वेधून घेतो आहे.
सरोजिनी नायडू या एक स्वातंत्र्यसैनिक आणि कवयित्री होत्या ज्यांनी देशाला ब्रिटीशांपासून मुक्त करण्यासाठी कार्य करताना सामाजिक रूढी सुधारण्यासाठी कार्य केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या आणि राज्याच्या (संयुक्त प्रांत) राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला म्हणून त्यांनी इतिहास घडवला.
नॉर्वेचे माजी हवामान आणि पर्यावरण मंत्री एरिक सोल्हेम यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. 1928 मध्ये रेकॉर्ड केलेल्या 55-सेकंदाच्या क्लिपमध्ये, श्रीमती नायडू, एक स्त्री म्हणून, ती "नवीन जगात" भारताचे प्रतिनिधित्व कसे करते आणि जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक युनायटेड स्टेट्सवर कोणते धडे देऊ शकते याबद्दल एक प्रेरक भाषण देताना दिसतात. व्हिडीओमध्ये नायडू म्हणतात, "मित्रांनो, मी हजारो मैल दूरवरून तुमच्याकडे येत आहे, एका अतिप्राचीन देशाची जगातील सर्वात तरुण राष्ट्राची राजदूत म्हणून मी येथे आले आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या देशाला तुम्हाला परंपरावादी मानायला शिकवले जाते. त्याच देशात एका महिलेची प्रतिनिधी आणि राजदूत म्हणून निवड केली आहे.
व्हिडिओ
Beautiful! Proud of Bharat 🇮🇳!
Rare footage of India’s Sarojini Naidu speaking to Americans during a visit to the US in 1928.
— Erik Solheim (@ErikSolheim) February 6, 2023
सरोजीनी नायडू यांनी पुढे म्हटले की, भारताच्या संस्कृतीने महिलांना फार पूर्वीपासून आघाडीवर ठेवले आहे. जर तुम्ही भारतीय संस्कृतीचा संपूर्ण इतिहास वाचलात, तर तुम्हाला हे लक्षात येईल की स्त्रिया ही तिथल्या संस्कृतीचा, तिच्या सर्व प्रेरणेचा आणि अनेक शतकांपासून परदेशात गेलेल्या शांततेच्या दूतावासांचा केंद्रबिंदू आहे, असेही सांगताना त्या दिसतात.