नासा ने शेअर केलेले पृथ्वीचे अद्भूत फोटो (Photo Credits: Insta)

नॅशनल एयरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (National Aeronautics and Space Administration) यांनी गुरुवारी 15 एप्रिल 2021 रोजी अवकाशातून घेतलेली पृथ्वीची काही आकर्षक छायाचित्रे शेअर केली आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पोस्टनुसार, नासाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेले फोटो आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या व्हँटेज पॉईंटवरून (Vantage point of the International Space Station) घेण्यात आले आहेत.

शेअर केलेल्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, 'या जबरदस्त फोटोंमध्ये आकर्षक प्रतिमा, जमीन, पाणी, हवा, बर्फ या नैसर्गिक वातावरणात जीवन एकत्रित करण्यासाठी एकमेकांना जोडतात. आपण जमिनीवर असलो की, अंतराळात असो. या छोट्या निळ्या ग्रहाने आपण एकत्र आहोत आणि हे सर्व एक उत्सव साजरा करण्यासारखे आहे. (वाचा - NASA च्या अंतराळवीरांचे मोठे यश; पहिल्यांदाच International Space Station मध्ये उगवण्यात आला 'मुळा' (Watch Video))

 

View this post on Instagram

 

A post shared by NASA (@nasa)

या फोटोंना ऑनलाइन शेअर केल्यापासून 1 कोटी 30 लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. नासाने शेअर केलेली पृथ्वीची ही छायाचित्रे पाहून सर्वांनाचं आश्चर्य वाटले आहे. अंतराळातून पृथ्वी इतकी आश्चर्यकारक आणि सुंदर दिसत आहे, यावर विश्वास बसत नाही. नासाने एकापाठोपाठ एक 4 छायाचित्रे शेअर केली आहेत.