PM Narendra Modi Kulfi (Photo Credits: ANI)

सुरत: लोकसभा निवडणुकीचा  (Loksabha Elections 2019 Results) निकाल लागताच नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi)  फॅन्समध्ये जोरदार सेलिब्रेशनची सुरवात झाली आहे. कोणी लाडू पेढे वाटून तर कोणी चहा वाटप करून आपापल्या पद्धतीने आनंद साजरा करत आहे. पण गुजरात (Gujrat)  येथील एका आईस्क्रीम दुकानाच्या विक्रेत्याने सेलिब्रेशनसाठी अगदी हटके फंडा वापार्ल्याचे समजत आहे. सुरत मधील विवेक अजमेरा (Vivek Ajmera)  या आईस्क्रीम विक्रेत्याने चक्क मोदींच्या चेहऱ्याची प्रतिकृती असलेली सीताफळ कुल्फी तयार केली आहे. या कुल्फीची झलक पाहण्यासाठी आणि चव चाखण्यासाठी सध्या अजमेरा यांच्या दुकानात तुफान गर्दी झाली आहे. त्यासोबतच हा मोदींच्या चेहऱ्याच्या रूपातील कुल्फीचा एक फोटो देखील सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अजमेरा यांना या हटके कुल्फीची कल्पना सुचली आणि मग दुकानातच कामगारांच्या मदतीने ही कुल्फी बनवण्याची प्रक्रिया सुरु झाली. या कुल्फीचे वैशिष्ट्य म्हणजे यावरील चेहरा कोरण्यासाठी कोणत्याही मशीनचा किंवा अद्ययावत उपकरणाचा वापर केलेला नसून सर्व कामगारांनी आपल्या हाताने हा मोदींचा चेहरा तयार केला आहे. नरेंद्र मोदी सीताफळ कुल्फीचे 200 नग बनवण्यासाठी कामगारांना तब्बल 24 तास सलग मेहनत करावी लागली होती पण आता त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटते असे विवेक अजमेरा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. नरेंद्र मोदी यांच्या जबऱ्या फॅनची अनोखी स्कीम, मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेईपर्यंत प्रवाश्यांना देणार मोफत रिक्षा प्रवास

(Watch Video) 

नरेंद्र मोदी यानाचा विजय साजरा करण्यासाठी बनविण्यात आलेली ही हटके कुल्फी केवळ 30 मे पर्यंत ग्राहकांना पुरवण्यात येईल. मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेईपर्यंत ही कुल्फी 50 टक्के सवलतीच्या दरात विकली जाणार आहे. या कुल्फी साठी वापरण्यात आलेली सामग्री ही पूर्णतः नैसर्गिक असून यात कोणतेही केमिकल रंग देखील मिसळण्यात आले नाहीत असा विश्वास अजमेरा यांनी व्यक्त केला.