शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray) यांचा एक जुना व्हिडिओ युट्युबवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (LK Advani) यांच्यासोबतच्या चर्चेचा उल्लेख केला आहे. हा उल्लेख गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबतचा आहे. हा व्हिडिओ नेमका कोणत्या सभेतील आहे याबाबत नक्की सांगता येत नाही. परंतू, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या अखेरच्या काही भाषणांपैकी हा एक व्हिडिओ असावा असे दिसते. कारण शेवटच्या काळातील काही अपवाद वगळता बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही खुर्चीत बसून भाषण केले नाही. या व्हिडिओत भाषण करताना बाळासाहेब खुर्चीत बसलेले दिसतात. त्यावरुन हा व्हिडिओ बाळासाहेब ठाकरे यांच्या अखेरच्या काळातील असावा हे स्पष्ट होते.
बाळासाहेब ठाकरे यांनी व्हिडिओमध्ये काय म्हटले आहे?
''आता नरेंद्र मोदी... आमच्या या पुतण्याला त्यांच्याबाबत प्रेम आले आहे. हरकत नाही. पण, गुजराती समाज हा शिवसेनेसोबत इमानाने नेहमी राहात आला आहे. एकदा मी मनोहर जोशी, अडवाणी, प्रमोद जोशी महापौर बंगल्यावर बसलो असताना. लालकृष्ण अडवाणी म्हणाले प्रमोद.. मनोहर और आप थोडा बाहर बैठीये ... मुझे बालासाहब के साथ थोडा बात करना है... ते दोघे उठून गेले. मला त्यावेळी अडवाणी यांनी प्रश्न विचारला .... बाळासाहब ये नरेंद्र मोदी के बारे मे आप क्या सोचते है..? क्या विचार करते है.... म्हटले आपके पार्टीका है... अडवाणी म्हणाले नही... नही एैसा नही.. पार्टीमे थोडा गडबड चल रही है... मी एका वाक्यात सांगितले....नही... नरेंद्र मोदी गया... तो .... गुजरात गया.... आजही लालकृष्ण अडवाणी आहेत.. त्यांना फोन करुन कधीही विचारा...!'' (हेही वाचा, Maharashtra Assembly Elections 2019: ... म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली: छगन भुजबळ)
व्हायरल व्हिडिओ
दरम्यान, पुढे विधानसभा निवडणूक 2014 मध्ये शिवसेना-भाजप युतीमध्ये अंतर आले. दोन्ही पक्ष ही निवडणूक वेगवेगळे लढले. त्या वेळीही युतीत अंतर येईल असे काही करु नका असे लालकृष्ण अडवाणी आणि भाजप नेत्यांना सांगितल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून आल्या होत्या. पण, अखेर युती तुटलीच. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन युती तुटल्याची घोषणा केली. पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात असताना भुखंड घोटाळा प्रकरणात राजीनामा द्यावे लागलेले एकनाथ खडसे युती तोडण्याची घोषणा करण्यात आघाडीवर होते.