हर्ष गोयंका यांनी शेअर केला मिझोरमच्या Cloud Waterfall चा मंत्रमुग्ध करणारा व्हिडिओ (Watch Here)
Cloud Waterfall (Photo Credits: Twitter)

उद्योगपती हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनी ट्विटरवर एक मंत्रमुग्ध करणाऱ्या धबधब्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हर्ष गोयनका यांनी रिट्विट केलाला हा व्हिडिओ मिझोरमच्या (Mizoram) आयजोलचा (Aizawl) आहे. हा व्हिडिओ 24,000 हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच 'द बेटर इंडिया' (The Better India) ने देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे. 30 सेकंदाच्या या व्हिडिओचे श्रेय सायमन जॅगर यांना देण्यात येते. या व्हिडिओतून तुम्ही पाहू शकाल की, प्रचंड मोठा पाण्याचा प्रवाह डोंगरमधून खळखळून वाहत आहे. हे पाणी दुधासारखे पांढरे दिसत आहे.

या व्हायरल व्हिडिओतील नजारा पाहण्यासाठी विशिष्ट वातावरणाची आवश्यकता असते. त्यामुळे हे असे दुर्लभ, विलोभनीय दृश्य पाहायला मिळते. हे खरेखुरे दृश्यं पाहून नेटकरी मंत्रमुग्ध झाले आहेत, असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली असून हे अद्भुत दृश्य शेअर केल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत.

पहा व्हिडिओ:

Cloud Waterfall चा व्हिडिओ हर्ष गोयंका यांना देखील भावला असून शेअर करण्याचा मोह त्यांनाही आवरता आलेला नाही. निसर्गाच्या सौंदर्याचे उत्तम उदाहरण आहे. विशेष म्हणजे ही निसर्ग सौंदर्य आपल्या देशाला लाभलं आहे, ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.