Girl Suddenly Falls From 3rd Floor Balcony: धक्कादायक! सुरतमध्ये तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून पडली अल्पवयीन मुलगी; मुलीला पाहून आई बेशुद्ध, Watch Video
Girl Suddenly Falls From 3rd Floor Balcony (PC - Twitter)

Girl Suddenly Falls From 3rd Floor Balcony: सुरतमध्ये (Surat) एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून एक मुलगी उलटून पडल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान, मुलीला पडलेलं पाहून तिची आईही बेशुद्ध पडली. ही संपूर्ण घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जखमी मुलीला तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगीचौक येथील तुलसी रो हाऊसजवळील तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून एक मुलगी पडली. मुलगी गॅलरीतून पडल्याने वयोवृद्धांसह त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी गर्दी केली. मुलीची आई खाली घटनास्थळी पोहोचली आणि हे सर्व दृश्य पाहून ती बेशुद्ध पडली. (हेही वाचा -Viral Video: माणुसकीला काळीमा! जबलपूरमध्ये तिघांनी मिळून दोन कुत्र्यांना विष देऊन ठार केलं; Watch Viral Video)

दरम्यान, घटनास्थळी असलेल्या इतरांनी तातडीने मुलीला रुग्णालयात नेले, जिथे ती सध्या वैद्यकीय उपचार घेत आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, परिस्थितीचे गांभीर्य उघड झाले आहे. ही मुलगी दहावीत शिकणारी विद्यार्थिनी आहे.