सर्वोच्च न्यायालयाची फटाक्यांना सशर्त परवानगी (Photo credits: Twitter)

सर्वोच्च न्यायालयाने आज देशभरात फटाक्यांवरील बंदीच्या याचिकेवर महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. आज न्यायधीश ए. के. सिकरी आणि न्यायधीश अशोक भुषण यांच्या खंडपीठाने फटाक्यांच्या आतषबाजीला सशर्त परवानगी दिली आहे. पर्यावरणाला त्रास न होणार्‍या ग्रीन फायरक्रॅकर्सचा वापर विशिष्ट वेळेच्या मर्यादेमध्ये वापर करण्यास, उडवण्यास परवानगी दिल्याने अनेकांचा गोंधळ उडाला आहे.

ग्रीन फायरक्रॅकर्स ही संकल्पना नेमकी काय असते? हे ठाऊक नसल्याने अनेकांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची गंमतीशीर पद्धतीने फिरकी घेत ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

ग्रीन फायरक्रॅकर्स (Green Firecrackers) म्हणजे नेमकं काय ?

ग्रीन फायरक्रॅकर्स बनवण्यासाठी पुन्हा वपारता येऊ शकतो अशा कागदाचा वापर केला जातो. इतर फटाक्यांप्रमाणे यामध्ये केमिकल्सचा वापर केलेला नसतो.तसेच या फटाक्यांमधून धूर बाहेर पडण्याचं प्रमाणही कमी असतं. अशाप्रकारच्या फटाक्यांमुळे निसर्गाचं नुकसान होण्याचा धोका कमी असतो. दिवाळी हा रोषणाईचा सण असल्याने विविध आकाराचे, आवाजाचे आणि स्वरूपाचे फटाके दिवाळीच्या दिवसात बनवले जातात. नक्की वाचा :  फटाके बंदीसाठी पाच वर्षाच्या या '3' चिमुकल्यांनी सर्वोच्च न्यायालायात मागितली होती दाद

 

पर्यावरणाला त्रास न होणार्‍या फटाक्यांना उडवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी वेळेचं बंधन घालण्यात आलं आहे. तसंच ऑनलाईन माध्यमातून फटाके विकण्यास सक्त मनाई आहे. पहा कधी आणि कोणत्या वेळेत तुम्हांला फटाके उडण्यास परवानगी देण्यात आली आहे.