Lightning Fell On a Flying Plane (PC - X/@thenewarea51)

Lightning Fell On a Flying Plane: निसर्गासमोर मानवाची शक्ती काहीच नाही. हे अनेकदा सिद्ध झाले आहे. निसर्गाने आपल्याला याचा प्रत्येयही वेळोवेळी दाखवला आहे. अशी काही उदाहरणे पाहिले की, निसर्गासमोर आपले अस्तित्व काही नाही, हे लक्षात येते. नुकताच निसर्गाचा आणखी एक प्रकोप पाहायला मिळाला. ज्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे भितीदायक दृश्य पाहून लोक घाबरले आहेत.

एअर कॅनडाच्या बोईंग 777 फ्लाइटने व्हँकुव्हरहून उड्डाण केले होते. उड्डाण होताच त्यावर वीज कोसळली. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, विमान आकाशात उंचावर पोहोचताच अचानक वीज चमकू लागते आणि त्यानंतर विमानावर वीज पडते. विमानाने व्हँकुव्हर विमानतळावरून लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उड्डाण केले होते. पण वाटेत हा अपघात झाला. या फ्लाइटमध्ये सुमारे 400 लोक बसले होते. सुदैवाने, विमानाला काहीही झाले नाही आणि सर्व प्रवासी सुखरूप बचावले. (हेही वाचा -Rhino Chases Safari Vehicle: सफारी वाहनाच्या मागे 1.5 किलोमीटर धावत राहिला गेंडा; आसाममधील मानस राष्ट्रीय उद्यानातील घटना (Watch Video))

विजेचा विमानावर अजिबात परिणाम होत नाही. कारण विमानाचा बाहेरचा थर अशा प्रकारे बनवला जातो की त्यावर विजेचा प्रभाव पडत नाही. विमान तयार करताना वैज्ञानिक त्यात कार्बन मिसळतात. याच्या मदतीने विमानाभोवती वीज पडू नये म्हणून संपूर्ण विमान तांब्याच्या पातळ थराने झाकले जाते. अशा परिस्थितीत जेव्हा वीज पडते तेव्हा त्याचा आवाज प्रवाशांना नक्कीच ऐकू येतो. पण त्याचा उड्डाणावर परिणाम होत नाही. (हेही वाचा - Cushionless Seats In IndiGo Flight: इंडिगोच्या बेंगळुरू-भोपाळ फ्लाइटमध्ये कुशन नसलेल्या सीट पाहून प्रवासी हैराण; ट्विटरवर फोटो शेअर केल्यानंतर एअरलाइनने दिली 'अशी' प्रतिक्रिया)

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल -

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @thenewarea51 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी लाईक केले असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या फ्लाइटमध्ये विज कोसळतानाचे अनुभव शेअर केले आहेत.