Rhino Chases Safari Vehicle: सफारी वाहनाच्या मागे 1.5 किलोमीटर धावत राहिला गेंडा; आसाममधील मानस राष्ट्रीय उद्यानातील घटना (Watch Video)
Rhino Chases Safari Vehicle (PC - You Tube/CNN-News18)

Rhino Chases Safari Vehicle: सोशल मीडियावर गेंड्याचा (Rhino) एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. आसामच्या मानस नॅशनल पार्क (Manas National Park) मध्ये एक गेंडा पर्यटक सफारी (Safari Vehicle) च्या मागे 1.5 किलोमीटर धावत राहिला. ही संपूर्ण घटना एका पर्यटकाने कॅमेऱ्यात कैद केली आहे. मात्र, हा व्हिडिओ कधी शूट करण्यात आला हे कळू शकले नाही. या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय उद्यानातील बांसबारी जंगल परिसरात गेंडा वाहनाचा पाठलाग करताना दिसत आहे. गेंडा 1.5 किलोमीटरपर्यंत वाहनाचा पाठलाग करत धावत राहतो. त्यानंतर सफारीचा वेग वाढतो आणि मग गेंडा त्याच्या मागे धावणे थांबवतो.

गेंड्यांनी पर्यटकांच्या वाहनांचा पाठलाग केल्याची किंवा जवळ येण्याची ही पहिलीच घटना नाही. 2022 मध्ये, एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये एक गेंडा झुडपातून बाहेर येताना आणि आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात सफारी जीपमध्ये बसलेल्या पर्यटकांचा पाठलाग करताना दिसत होता. (हेही वाचा -Rhinoceros Viral Video: एक शिंगी गेंडा मागे लागताच पर्यटकांची घाबरगुंडी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

पहा व्हिडिओ -

गेंडा त्यांच्या मागे काही किलोमीटर धावत होता. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मानस राष्ट्रीय उद्यानाला 1985 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केले होते. ते भूतानच्या सीमेजवळ आहे. राष्ट्रीय उद्यानात समृद्ध जैवविविधता आहे आणि सस्तन प्राणी, पक्षी, वाघ, सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या विविध प्रजातींचे निवासस्थान आहे.