Rhinoceros Viral Video: एक शिंगी गेंडा मागे लागताच पर्यटकांची घाबरगुंडी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Rhinoceros | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

One-horned Rhinoceros Chasing on Tourist: जंगल सफरीवर जाणे हे आपल्यापैकी अनकांचा आवडता छंद. कधी नववर्ष, कधी नाताळ, दिवाळीच्या सुट्टीत तर कधी वार्षिक सहल म्हणून. आपल्यापैकी अनेक लोक जंगल सफरीवर जातात. या सफरीत नानाविध अनुभव येतात. पर्यटकांना असाच एक काहीसा धक्कादायक अनुभव जंगलसफरीदरम्यान आला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आपणही हा व्हिडिओ यथे पाहू शकता. वृत्तसंस्था एएनआयने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ असम राज्यातील मानस नॅशनल पार्क (Manas National Park Assam) येथील आहे. जंगल सफरीवर असलेल्या पर्यटकांच्या एका वाहनाच्या मागे एकशिंगी गेंडा लागतो त्या घटनेचा हा व्हिडिओ आहे. ही घटना 29 डिसेंबर रोजी घडली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच, कोणी जखमीही झाले नसल्याची माहिती मानस राष्ट्रीय उद्यानाचे वन परिक्षेत्र अधिकारी बाबुल ब्रह्मा यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Viral Video: भंडाऱ्यात रानटी हत्तींचा धुडगूस; हत्तीने दुचाकीला लाथ मारून चिरडले; सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय 'हा' व्हिडिओ)

ट्विट

व्हिडओत पाहायला मिळते आहे की, काही पर्यटक एका कारमधून जंगल सफरीवर गेले आहेत. त्यांचे वाहन जंगलातील रस्त्यांवरुन निघाले आहे. दरम्यान, जंगलातील झाडांमधून एक गेंडा धावतच रस्त्यावर येतो. त्याच्या दृष्टीस पर्यटकांचे हे वाहन पडते. तो या वाहनाचा पाटलाग करतो. दरम्यान, वाहनचालक वाहन वेगाने हाकतो. त्यामुळे गेंड्याला वाहनाच्या वेगाने पाटलाग करण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे तो मागे पडतो. पर्यंटकांची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडते. आपणही येथे हा व्हिडिओ पाहू शकता.