Viral Video: एका हत्तींच्या कळपाचा (Herd of Elephants) जंगलाचा रस्ता ओलांडतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर व्हायरल होत आहे. अहवालानुसार, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील आहे. ट्विटर व्हिडिओंमध्ये लोक हत्तीला रस्ता ओलांडेपर्यंत थांबत आहेत. रस्त्यावर एक मोटरसायकल असलेली पाहायला मिळत आहे. हत्तींचा कळप जंगलात जाण्यासाठी रस्ता ओलांडतो. मात्र, यावेळी एक मोठा हत्ती रस्त्यावर लावलेल्या मोटरसायकलला जोरदार धडक देतो आणि ती मोटरसायकल झुडपात जाऊन पडते. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सुदैवाने या दुचाकीवर कोणीही बसलेले नव्हते. त्यामुळे मोठा अपघात टळला. हा व्हिडिओ शुक्रवारी ट्विटरवर शेअर करण्यात आला असून तो शेकडो वेळा पाहिला गेला आहे. लोकांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर इतर नेटिझन्ससह फुटेज रिट्विट केले आणि शेअर केले आहे. (हेही वाचा -Watch: पाकिस्तानी युट्युबरने आपल्या लग्नात पत्नीला भेट म्हणून दिले गाढवाचे पिल्लू, व्हिडिओ व्हायरल)
रानटी हत्तींचा कळप सद्या भंडारा जिल्ह्यात असून नागरिकांना वारंवार सूचना देऊनही ते या कळपाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. त्याचे परिणाम काय होतात ते बघा...!@MahaForest@ranjeetnature@WildEleEarth#elephant pic.twitter.com/vUdU0HXqB0
— Sumit Pakalwar (@PakalwarSumit) December 8, 2022
दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दहेगाव माईन्स येथे हत्तीच्या कळपाने धुडगूस घातला आहे. शुक्रवारी हत्तींनी प्रथमच गावात प्रवेश करून तीन घरांच्या भिंती पाडून तोडफोड केली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती होताच वन कर्मचा-यांनी गावात धाव घेऊन हत्तींना जंगलाच्या दिशेन हाकलून लावले.