दगड भिरकावून हकलणाऱ्या व्यक्तीला कांगारु ने शिकवला धडा; पहा Viral Video
Kangaroo punch man | (Photo Credits: Twitter)

Viral Video: आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी पालक काहीही करु शकतात. प्राण्यांपासून आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी दगड मारुन प्राण्यांना हकलवणे अगदी स्वाभाविक आहे. ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीने असेच काहीसे केले. मात्र त्याची ती कृती त्याला चांगलीच महागात पडली. डेली मेल च्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलिया (Australia) च्या साऊथ वेस्ट रॉक्स (South West Rocks) मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लहान मुलांना कांगारुपासून वाचवण्यासाठी त्याच्या दिशेने दगड भिरकावला. परंतु. कांगारुने देखील याचे चांगलेच प्रत्युत्तर दिले. दगड आपल्या दिशेने येताच कांगारु टूनटून उड्या मारत त्या व्यक्तीकडे गेला. त्याला एक गुद्दा हाणला आणि तेथून उड्या मारत झटकन पसार झाला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

ख्रिसमसच्या दिवशीची ही घटना आहे. या व्यक्तीचे नाव मिशेल रोबिनसन असे असून त्याच्या घराजवळ एक कांगारु उभा होता. तो त्याच्या आणि त्याच्या मुलांकडे खूप वेळापासून पाहत होता. त्यामुळे मुलांना त्याच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी मिशेल यांनी कांगारुला दगड मारला. मात्र दगड मारल्यावर पळून जाण्याऐवजी कांगारु त्या व्यक्तीच्या दिशेने आला आणि त्याला पंच मारुन त्याला खाली पाडले. (दिल्ली मध्ये घराबाहेर स्पॉट झाली महाकाय पाल; आकार पाहून नेटिझन्स म्हणतात हा असू शकतो Komodo Dragon)

पहा व्हायरल व्हिडिओ:

कांगारुच्या या हल्ल्यात मिशेल यांच्या एका हाताला दुखापत झाली. या घटनेबद्दल बोलताना मिशेल यांची फॅमेली फ्रेंड टीना ग्रेस रोवे यांनी सांगितले की, "कांगारु खूप मोठा होता. त्याच्या हल्ल्यात मोठी दुखापत झाली असती. मात्र सुदैवाने केवळ मिशेल यांच्या एका हातालाच दुखापत झाली. बाकी ते ठीक आहेत."