Huge Monitor Lizard Viral Photos: दिल्ली मध्ये घराबाहेर स्पॉट झाली महाकाय पाल; आकार पाहून नेटिझन्स म्हणतात हा असू शकतो Komodo Dragon
Monitor lizard in Delhi (Photo Credits: Twitter)

लॉक डाऊन (Lockdown) सुरु झाल्यापासून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक विचित्र किंबहुना कधी न पाहिलेले अनेक प्राणी पक्षी पाहायला मिळाले आहेत. आता सुद्धा दिल्ली (Delhi)  मधून एक असाच फोटो व्हायरल होत आहे. ज्या मध्ये दिल्लीतील एका घराच्या बाहेर महाकाय पाल (Huge Monitor Lizard) स्पॉट झाली आहे. नेटिझन्सने हि पाल पाहून हा कोमोडो ड्रॅगन (Komodo Dragon) तर नाही ना असे तर्क वितर्क लावायला सुरुवात केली आहे. या पालीचे वैज्ञानिक नाव हे मॉनिटर लिझार्ड असे असून ही सर्वात मोठी पाल असते. दिल्ली (Delhi) मधील हे फोटो तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया सुद्धा चर्चेत आहेत. Yellow Frogs Mating Spotted: निसर्गाची किमया! वसई आणि बुलढाणा येथे पावसाने शेतात साचलेल्या डबक्यात आढळले पिवळे बेडूक (See Photos & Videos)

मॉनिटर लीझर्ड्स या भारतात मुख्यत्वे उत्तरेकडील भागात आढळून येतात, हिमाचल प्रदेश मध्ये या पाली अनेकदा स्पॉट झाल्या आहेत. आता दिल्ली मधील फोटो व्हायरल झाल्यावर अनेकांनी त्यांच्या घरालगत किंवा परिसरात अशाच पाली दिसल्याचे फोटो सुद्धा शेअर केले आहेत. काहींनी ही पाल Komodo Dragon असल्याचे म्हंटले आहे. हे ड्रॅगन इंडोनेशिया मध्ये आढळतात व अत्यंत विषारी असतात. Shaaz Jung याने क्लिक केलेला Black Panther चा जंगलातील सुंदर फोटो होतोय व्हायरल; नेटकरी म्हणतात हा तर बगिरा (See Photos)

पहा महाकाय पालीचे व्हायरल फोटो

दरम्यान, मॉनिटर लिझार्ड या 61 ते 175 सेमी इतक्या लांब असतात त्यांची शेपटी ही अधिक जाड आणि लांब निमुळती असते. जोपर्यंत त्यांना धोका वाटत नाही तोपर्यंत त्या चावायला किंवा हल्ला करायला येत नाहीत.