Black Panther (Photo Credits: shaazjung/ Instagram)

Black Panther Viral Photos: काल पासुन सोशल मीडियावर काळ्या रंंगाच्या पँथरचे (Black Panther) दोन अत्यंत सुंदर फोटो व्हायरल होत आहेत. हा पँथर जंंगलात वावरताना हे फोटो क्लिक केलेले आहेत. मागील वर्षी म्हणजेच 2019 मध्ये Shaaz Jung या प्रसिद्ध फोटोग्राफर ने हे फोटोज क्लिक केले होते. प्राप्त माहितीनुसार हे फोटो भारतातीलच काबिनी (Kabini) या जंंगलातील आहेत. एका झाडाच्या खोडामागुन वाकुन पहाताना हा पॅंथर यात दिसत आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी च्या माध्यमातुन असे जंंगली प्राण्यांचे अर्थात ज्यांंना प्रत्यक्ष पाहण्याचा विचार करुनही भीती वाटावी अशा प्राण्यांंचे हे फोटो अगदी जवळुन आणि बारकाईने पाहण्याची संधी मिळाल्याने नेटकरी सुद्धा खुश झाले आहेत.अनेकांनी या प्राण्याला पाहुन जंंगल बूक (Jungle Book) मधील बगिरा (Bagira) सोबत तुलना केली आहे.  Punjab Cow Creates Record: पंजाबमधील करनाल येथील गाईने रेकॉर्डब्रेक करत 24 तासांत दिलं 76 लिटर दूध

काळ्या पॅंथरचे हे फोटो ट्विटर वर Earth या हॅंडल वरुन शेअर करण्यात आले होते, हे पेज अशाच सुंदर प्राण्यांचे फोटो शेअर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे फक्त भारतातच होऊ शकते असेही अनेकांनी म्हणत हे फोटो अधिकाधिक शेअर केले आहेत.

Black Panther Viral Photo

Shaaz Jung इंस्टाग्राम पोस्ट्स

 

View this post on Instagram

 

A post shared by Shaaz Jung (@shaazjung) on

सुरुवातीला या फोटोसाठी Shaaz Jung याला क्रेडिट न दिल्याने सुद्धा अनेकांनी यावर प्रश्न केले होते, स्वतः जंंग याने सुद्धा आपण हा फोटो काढल्याची आठवण करुन दिली होती. तुमच्या पैकी सुद्धा कोणाला हे फोटो शेअर करायचे झाल्यास फोटोग्राफर ला क्रेडिट देउन शेअर करु शकता. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हे जीव धोक्यात घालुन केले जाणारे एक काम आहे त्यासाठी त्या त्या फोटोग़्राफर ला निदान क्रेडिट देणे तरी आवश्यक आहे.