Punjab Cow Creates Record: पंजाबमधील करनाल येथील गाईने रेकॉर्डब्रेक करत 24 तासांत दिलं 76 लिटर दूध
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

केंद्र सरकार (Central Government) दुग्ध उत्पादनाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. अशातचं पंजाबमधील (Punjab) करनालमध्ये (Karnal) एक नवीन बातमी समोर आली आहे. करनालमधील एका गाईने (Cow) 24 तासात 76.61 लीटर दूध दिलं आहे. त्यामुळे या गाईने आतापर्यंतचं सर्वात मोठं रेकॉर्ड बनवलं आहे. करनालमधील राष्ट्रीय डेयरी संशोधन संस्थानच्या एका समितीने या गाईचं मुल्यांकन केलं आहे.

राष्ट्रीय डेयरी संशोधनचे निदेशक डॉ. एम एस चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, करनाल जिल्ह्यातील गालिब-खेड़ी गावातील शेतकरी बलदेव सिंह आणि त्याच्या भावाने 2010-11 मध्ये राष्ट्रीय डेयरी संशोधनमध्ये पशुपालनाचे प्रशिक्षण घेतले होते. प्रशिक्षणानंतर या दोघांनी स्वत:ची दूध डेअरी स्थापन केली. कोणतीही अडचण आल्यास हे दोन्ही भाऊ राष्ट्रीय संशोधन संस्थेचे मार्गदर्शन घेतात. सध्या त्यांच्याकडे 100 पेक्षा जास्त गाई आहेत. (हेही वाचा - वारकऱ्यांनी आषाढीवारीकरिता पंढरपुरात येऊ नये यासाठी पोलीस नाईक प्रसाद मनोहर औटी यांनी बनविलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; Watch Video)

दरम्यान, डॉ. चौहान यांनी ग्रामीण भागातील युवकांना कौशल्य विकासच्या धरतीवर काम करावं. बलदेव सिंहने सर्व युवकांसाठी नवा आदर्श निर्माण केला आहे. तरुणांनी त्यांच्या कामाकडे प्रेरित होऊन आदर्श निर्माण करावा, असं आवाहनही चौहान यांनी केलं आहे. (हेही वाचा - आश्चर्यकारक! 5 वर्षीय मुलाने तज्ञ ऑपरेटरप्रमाणे चालवला JCB, चकित वीरेंद्र सेहवागने व्हिडिओ शेअर करून केले कौतुक, (Watch Video))

बलदेव सिंहचा भाऊ अमनदीपने यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितलं की, आम्ही राष्ट्रीय डेयरी संशोधन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली दूध उत्पादनात मोठं रेकॉर्ड बनवलं आहे. आम्ही एका महिन्यात तब्बल 6 लाख रुपयांचं दूध विकतो. या व्यवसायात मोठा नफा मिळतो, असंही अमनदीप यांनी स्पष्ट केलं आहे.