वारकऱ्यांनी आषाढीवारीकरिता पंढरपुरात येऊ नये यासाठी पोलीस नाईक प्रसाद मनोहर औटी यांनी बनविलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; Watch Video
Video goes viral for Warkaris on the occasion of Ashadi Wari (PC - Facebook)

कोरोना पार्श्वभूमीवर (Coronavirus) यंदाची आषाढीवारी (Ashadhi Wari) पार पाडत असल्याने वारकऱ्यांनी पंढरपुरात (Pandharpur) येऊ नये यासाठी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक प्रसाद मनोहर औटी (Police Naik Prasad Manohar Auti) यांनी एक सूंदर व्हिडीओ बनविलेला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पोलिसांनी या व्हिडिओच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदाची पंढरपूर वारी घरात बसून पार पाडण्याचं आवाहन केलं आहे.

कोरोनाची महामारी यंदाची वारी घरच्या घरी ! असा संदेश या व्हिडिओमधून देण्यात आला आहे. राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा पंढरपूर येथे भरणाऱ्या आषाढी वारीत कोणत्याही वारकऱ्यांनी सहभागी होऊ नये. तसेच यंदाची वारी घरी राहून साजरी करावी, असं आवाहन या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. (हेही वाचा - Ashadhi Ekadashi 2020: आषाढी एकादशी 2020 मध्ये कधी आहे? जाणून घ्या व्रत, शुभ मुहूर्त वेळ आणि चातुर्मासाचा काळ)

दरम्यान, पंढरपूरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर कवडे यांनीदेखील सर्व विठ्ठल भक्तांना घरच्या घरी आषाढी वारी साजरी करावी. कोणीही वारीसाठी पंढरपूरात येऊ नये, असं आवाहनही कवडे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केलं आहे. (हेही वाचा - Ashadhi Ekadashi 2020 Wishes: आषाढी एकादशी निमित्त Images, WhatsApp Status, Messages द्वारे द्या शुभेच्छा!)

याशिवाय ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनीदेखील राज्यातील सर्व वारकऱ्यांनी यंदाची आषाढी वारी गावात राहून पार पाडण्याचे आवाहन केले आहे. यंदा आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी 1 जुलै दिवशी साजरी केली जाणार आहे.