Tricolor Waved By Parachute in Russia: रशियामध्ये पॅरेशूटच्या माध्यमातून हवेत फडकवला तिरंगा; Azadi Ka Amrit Mahotsav निमित्त पाहा शानदार व्हिडिओ
Tricolor Russia | (Photo Credit - Twitter)

अवघा देश आज स्वातंत्र्य दिन (Indian Independence Day 2022 ) साजरा करतो आहे. यंदाचा स्वतंत्र्य दिन काहीसा वेगळा आणि हटके आहे. देशाच्या स्वातंत्र्याला यंदा 75 वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे भारतीय नारिक स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा करतो आहे. केंद्र सरकारनेही आजादी का अमृत महोत्सव ही मोहीम राबवली आहे. महत्त्वाचे म्हणजे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात अनेक देशांच्या भारतीय दुतावासात (Indian Embassy) मोठ्या प्रमाणावर भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा होतो आहे. दरम्यान, रशियातील (Russia) भारतीय दूतावासाने आपल्या खास स्टाईलने स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. रशियामध्ये पॅरेशूटच्या माध्यमातून तिरंगा (Tiranga) फडकवण्यात आला आहे.

रशियामध्ये पॅरेशुटच्या माध्यमातून फडकवलेला तिरंग्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. युट्युबवर हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 38 हजारांहून अधिक युजर्सनी पाहिला आहे. हा व्हिडिओ ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्रालयालाही टॅग करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सत्यमेव जयतेच्या संदेशाने सुरु होतो. साधारण दिड मिनिटांचा हा व्हिडिओ भारतीय नागरिकांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देतो. मास्को येथील भारतीय दूतावासाने आकाशात फडकवलेला हा तिरंगा सर्वांचे लक्ष्य वेधून घेतो. (हेही वाचा, Indian Independence Day Celebration In Dubai: UAE मध्येही भारताचा स्वातंत्र्य दिन झाला साजरा, दुबई मॉलमध्ये झाला Flash Dance)

ट्विट

ट्विट

दरम्यान, रशियन दूतावासाने स्वातंत्र्य दिनानिमित्त राजदूत पवन कपूर यांच्या उपस्थ्तीत स्वतंत्रता दिवस साजरा केला आहे. त्यांनी महात्मा गांधी यांना पुष्पांजली अर्पण करुन आणि तिरंगा फडकवून राष्ट्रपतींचा संदेश वाचला.