भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत भारत देशात हर घर तिरंगा अभियान सुरू करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्य दिन भारतात तसेच परदेशातही साजरा केला जातो. असाच एक नजारा दुबईतील एका मॉलमध्ये पाहायला मिळाला, जिथे स्वातंत्र्याचा उत्सव खास पद्धतीने साजरा करण्यात आला. दुबईतील एका मॉलमध्ये फ्लॅश डान्सचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये शेकडो लोकांनी भाग घेतला होता. देशभक्तीपर गाण्यांवर लोक नाचले. यादरम्यान तेथे खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी झाली. जमावाने टाळ्या वाजवून नाचणाऱ्या लोकांना प्रोत्साहन दिले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)