ICC World Cup 2019: ट्विटर वरील देवानं कॉपी केलं क्रिकेटच्या देवाचं ट्विट, हे प्रकरण नेमकं आहे काय?
Twitter God Copies Tweet From God Of Cricket (Photo Credits: Twitter, File Image)

सोशल मीडियावरील तुम्ही लिहिलेली किंवा पोस्ट केलेली गोष्ट कोणी कधी कॉपी करेल याचा काही नेम लावता येत नाही. असाच काहीसा मजेशीर प्रकार ट्विटरवर पाहायला मिळाला. ट्विटर वरील देव "GOD" या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या एक युजर आयडी वरून क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याने केलेलं एक ट्विट तंतोतंत कॉपी करून वापरलं गेलं. ICC World Cup 2019: 26 मॅच नंतर कोण आहे टॉप-5 फलंदाज, गोलंदाज; पॉइंट्स टेबल, जाणून घ्या

सध्या सुरु असणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक (ICC World Cup) सामन्यात काल इंगलंड विरुद्ध श्रीलंका (ENG vs SRI) हा सामना रंगला होता, यामध्ये श्रीलंकेने आपल्या गोलंदाजांच्या जीवावर इंग्लंडच्या बलाढ्य टीमचा पराभव केला,यावर श्रीलंकेच्या टीम ला शुभेच्छा देत सचिनने एक ट्विट आपल्या अकाउंट वरून केले होते. मात्र या ट्विटर वरील देवाने या ट्विट मध्ये तसूभरही बदल न करता किंवा सचिनला क्रेडिट न देता हे ट्विट तंतोतंत कॉपी केलं. यानंतर मात्र नेटकऱ्यांनी या देवाला फैलावर घेत चांगलंच ट्रोल करायला सुरवात केली आहे. ICC Cricket World Cup: विराट कोहली नंतर भारतीय संघाचा कर्णधार कोण? निवड समितीकडे आहेत हे 3 पर्याय

 

काय होतं सचिनचं ट्विट :

"श्रीलंकेने कमाल कामगिरी केली आहे, टीमच्या फलंदाजांची बॅट न चालल्याने भासलेली उणीव त्यांनी गोलंदाजीत भरून काढली, मलिंगा आणि त्याच्या टीमने शिस्तबद्ध पद्धतीने इंग्लंडच्या संघातील फलंदाजांच्या नाकी नऊ आणले होते.आता येत्या दिवसात इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया, न्यू झीलँड आणि भारतासोबत सामना होणार आहे त्यामुळे विश्वचषक सामना अजून काय सरप्राईझ घेऊन येतो हे बघणे रंजक ठरणार आहे".

आता पाहा काय आहे ट्विटर वरच्या देवाचं ट्विट

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Netizens Trolling Twitter God (Photo Credits: Twitter)

या देवाच्या अकाउंट वरील बायोमध्ये स्वतःला अन्व्हेरीफाईड म्हंटले आहे आणि तरीही या अकाउंट ला तब्बल 5.95 मिलियन जण फॉलो करतात. तर या अकाउंट वरून मात्र केवळ जस्टिन बीबरचे अकाउंट फॉलो केले आहे. तसेच या अकाउंट वरून अगदी सातत्याने ट्विट केले जातात.