2019 चा आयसीसी विश्वकप सध्या पावसामुळे चांगलाच चर्चेत राहील आहे. यावेळीच्या विश्वकप स्पर्धेत तब्बल 4 सामने पावसामुळे रद्द करण्यात आले आहेत. यात भारताचा न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सामनाही आहे. मात्र, याचा खेळाडूंच्या खेळावर काही परिणाम झालेला दिसला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चर्चित नावं डेविड वॉर्नर (David Warner), स्टिव्ह स्मिथ (Steve Smith), असो किंवा बांगलादेशचा शाकिब अल हसन (Shakib Al Hasan), किंवा इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गन (Eoin Morgan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चर्चित नावांनी या विश्वकप मध्ये आपले अस्तित्व जाणून दिले आहे. (IND vs ENG मॅचसाठी भारतीय संघ होणार 'केशरी'; Team India वरही भगव्या रंगाची छाप असल्याचा Netizens चा सूर)
संध्या सगळे संघातले सामने रोमांचक होताना दिसत आहे आणि म्हणून सेमीफायनलला कोणते संघ जाणार आणि कोणता संघ बनणार 'जायंट किलर' याची उत्सुकता लागून राहिली आहे. विश्वकपमध्ये 31 सामने खेळले गेले आहे.
हे आहे ICC विश्वकपमधील टॉप फलंदाज
हे आहे ICC विश्वकपमधील टॉप गोलंदाज
भारताचा एकही गोलंदाज टॉप-5 किना टॉप-10 मध्ये ही नाही आहे. युझवेन्द्र चहल 3 सामन्यात 6 गाडी बाद करून 16 व्या क्रमांकावर आहे.
ICC गुणतालिका
विश्वकप स्पर्धेत गत विजेता ऑस्ट्रेलिया (Australia) चा संघ 6 मॅचमधील 5 सामने जिंकून ICC च्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर भारत (India) 4 सामने जिंकून तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड चा संघ 6 पैकी 5 सामने जिंकून पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे यजमान इंग्लंड 6 मॅचमधील 4 सामने जिंकून चौथ्या स्थानी आहे.
बांगलादेश ने सातपैकी तीन सामने जिंकले तर तीनमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. ते पाचव्या स्थानावर आहेत. गुणतक्त्यात सहाव्या स्थानावर असलेल्या श्रीलंका (Sri Lanka). त्यांचा 6 सामन्यात 7 गुण झाले आहेत. तर सातव्या स्थानावर असलेल्या पाकिस्तान (Pakistan) चे 6 सामन्यात 5 गुण आहे. अफगाणिस्तान (Afghanistan) चा सातही सामन्यात पराभव झाला असल्याने त्यांनी गुणतालिकेत तळ गाठले आहेत. तर वेस्ट इंडिज ने 7 सामन्यात 1 सामना जिंकून गुणतालिकेत 8 व्या तर दक्षिण आफ्रिका 9 व्या क्रमांकावर आहे.