प्रेयसी बरोबर शॉपिंग करताना रंगेहात पकडला गेला नवरा; पत्नीने भर रस्त्यात दोघांनाही दिला चोप (Watch Video)
Photo Credit : YouTube/Screengrab

Meerut: उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यात एका व्यक्तीला आपली मैत्रिणीसाठी कपडे घेणे तेव्हा महाग पडले जेव्हा त्याची पत्नी घटनास्थळी पोहचली. फक्त एवढेच नाही तर त्या पत्नीने त्या क्षणी आपला नवरा आणि त्याची प्रेयसी या दोघांना भर रस्त्यात मारायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार घडत असताना तिथे बऱ्याच लोकांची गर्दी जमा झाली काहींनी त्या घटनेचे फोटो काढले तर काहींनी व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि तोच व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.या घटनेची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहचली तेव्हा नौचंडी पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि सर्वांना पोलिस ठाण्यात आणले. दोघांनीही पती-पत्नीने पोलिस ठाण्यात एकमेकांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. (Ghaziabad Viral Video: गाझियाबादमधील महिलेने आपल्या खांद्यावर मुलीला बसवून चालवली बुलेट; धोकादायक स्टंट पाहून तुम्हीही व्हाल हैराण)

आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,खरखौदा क्षेत्र येथे काशीराम कॉलोनी निवासी महिलेचे लग्न एका वर्षापूर्वी शास्त्रीनगर सेक्टर-4 निवासी इसमाशी झाले होते. हा इसम रुग्णालय ही चलावतो.महिलेच्या म्हणण्यानुसार, तिला तिच्या पतीवर काही दिवसांपासून संशय होता. सोमवारी सकाळी ती महिला पतीचा पाठलाग करत घराबाहेर पडली. तिने आपल्या पतीला शास्त्री नगर सेक्टर -२ मध्ये एका गैर महिलेसोबत पाहिले. तेथून तिने त्यांचा पाठलाग सुरू केला. नौचंडी परिसरातील नवीन रस्त्यावरील दुकानात कपडे खरेदी करताना तिने दोघांनाही रंगेहाथ पकडले असल्याचा आरोप या महिलेने केला आहे.दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर मारहाण सुरू झाली. आणि मोठा गोंधळ सुरु झाला हा गोंधळ असा होता की पोलिसही काही काळ मौन दर्शक राहिले.

यापूर्वी पतीने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात नेले. येथे नवरा पोलिसांना घटस्फोटाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे दाखवू शकला नाही. या महिलेने आपल्या पतीविरूद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार दिली आहे.सीओने सांगितले की, नवरा म्हणतो की त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे आणि कोर्टात त्यांची केस चालू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नवऱ्याने सांगितले आहे की, तो एका स्त्री मैत्रिणी बरोबर होता.तेव्हा त्याच्या पत्नीने त्या दोघांना पाहिले आणि त्याच गोष्टीवरून दोघांमध्ये भांडण झाले. त्यावर आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे सीओने सांगितले.