Ghaziabad Viral Video: गाझियाबादमधील महिलेने आपल्या खांद्यावर मुलीला बसवून चालवली बुलेट; धोकादायक स्टंट पाहून तुम्हीही व्हाल हैराण
बुलेटवर स्टंट करणारी मुलगी (Photo Credits: Twitter)

Ghaziabad Viral Video: सध्या सोशल मीडियावर गाझियाबादमधील (Ghaziabad) एका मुलीचा बाईक स्टंटचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मुलींनी लाल रंगाचे टीशर्ट घातलेले आहेत. यातील एक मुलगी बुलेट चालवत असून दुसरी मुलीग तिच्या खांद्यावर आरामात बसली आहे. या स्टंटचा व्हिडिओ सर्वांनाचं आश्चर्यचकित करणारा आहे. कारण, आपल्या खांद्यावर असं ओझं घेऊन दुचाकी चालविणे इतकी सोपी गोष्ट नाही. हा स्टंट करताना काहीही दुर्घटना होऊ अपघात होऊ शकतो.

हा व्हिडिओ एनबीटी ट्विटर नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गाझियाबाद ट्रॅफिक पोलिसांनी विना हेल्मेट-टू-व्हिलर चालविण्यासाठी 1000 रुपये शुल्क, सार्वजनिक ठिकाणी स्पीडची परवानगी न घेता बाईक चालवण्याने 5000 रुपये आणि ड्रायव्हिंग वाहन नियंत्रण कलम 3 आणि 4 साठी 4000 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. म्हणजेच, या प्राणघातक स्टंटसाठी मुलींना 11 हजारांचा दंड भरावा लागला आहे. (वाचा -Goat Viral Video: बकरी सोबत सेल्फी घेणं महिलेला पडलं महागात; रागाच्या भरात शेळीने केला हल्ला, पहा व्हिडिओ)

व्हायरल व्हिडिओ पहा:

पोलिसांनी शेअर केलं चलान - 

याप्रकरणी गाझियाबाद ट्रॅफिक पोलिसांनी ट्वीट केले आहे की, त्वरित कारवाईची मागणी करुन वरील वाहनासाठी 11000 रुपयांचे चालान वजा करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये पोलिसांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटलं आहे की, सर्वांनी रहदारीच्या नियमांचे अनुसरण करावे, कोणताही स्टंट करून आपला आणि इतरांचे जीवन धोक्यात घालू नका. व्हिडिओमध्ये दर्शविलेला कोणताही स्टंट करण्याचा प्रयत्न करू नका, हे धोकादायक ठरू शकते.