Goat Viral Video: बकरी सोबत सेल्फी घेणं महिलेला पडलं महागात; रागाच्या भरात शेळीने केला हल्ला, पहा व्हिडिओ
बकरी ने महिलेवर केला हल्ला (Photo Credits: Instagram)

Goat Viral Video: आजकाल लोक कोणत्याही खास प्रसंगी सेल्फी ((Selfie) घेण्यास विसरत नाहीत. लोकांमधील सेल्फीची क्रेझ पाहता सध्या सेल्फीचा ट्रेंड आला आहे. महिला असो की पुरुष, प्रत्येकाला सेल्फीचा मोह आवरता येत नाही. सेल्फी घेण्याच्या नादातही बर्‍याच वेळा लोक आपला जीव धोक्यात घालतात. दरम्यान, सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक महिला बकरीबरोबर (Goat) सेल्फी घेताना दिसत आहे. परंतु, बकरीसोबत सेल्फी घेणं या महिलेला चांगलचं महागात पडलं आहे. कारण, रागाच्या भरात बकरीने या महिलेवर हल्ला केला. महिलेबरोबर घडलेला हा प्रसंग पाहून नेटीझन्स हैराण झाले आहेत.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर thewildcapture नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या या व्हिडिओला नेटीझन्स सोशल मीडियावर लाईक तसेच कमेंन्ट देत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 536,924 व्यूज मिळाले आहेत. ही पोस्ट शेअर करताना वापरकर्त्यांने लिहिलं आहे की, काही चुकीचे होण्याची शक्यता आहे का? या व्हिडिओमध्ये ही महिला बकरीसोबत सेल्फी घेते आणि व्हिडिओ बनवत आहे. परंतु, हे त्या बकरीला आवडत नाही. (वाचा - तहानलेल्या किंग कोब्राला सर्पमित्राने बाटलीने पाजले पाणी; अचंबित करणारा व्हिडिओ व्हायरल (Watch Here))

 

View this post on Instagram

 

A post shared by Wildlife Capture (@thewildcapture)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, एक महिला जंगलात बकरीसोबत सेल्फी व्हिडिओ घेत आहे. या बकरीला काही अंतरावर दोरीने बांधण्यात आले आहे. बकरीबरोबर विविध प्रकारचे एक्स्प्रेशन देऊन ही महिला सेल्फी घेत आहे. यावेळी, महिला मागे-पुढे जात आहे. यादरम्यान, बकरीला राग आला आणि तिने पुढे झेप घेऊन महिलेच्या डोक्यावर जोरात शिंग मारलं. शिंग मारल्याने संबंधित महिलेचा मोबाईल खाली पडतो. व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटत आहे की, महिलेने आपला सेल्फी काढल्याचा राग आल्याने बकरीने तिच्यावर हल्ला केला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.