सापाच्या (Snakes) विभिन्न प्रजातीत किंग कोबरा साप (King Cobra Snake) अत्यंत विषारी आणि खतरनाक समजला जातो. कोब्रा सापाच्या दंशातून वाचणे अत्यंत कठीण आहे. यासाठी कोब्रा असे नाव काढताच अनेकांचे धाबे दणाणतात. असे असताना कोब्रा सापाला बाटलीने पाणी प्याजण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सर्पमित्रांनी (Snake Rescue Team) तहानलेल्या सापाला जंगलात सोडण्यापूर्वी बाटलीने पाणी पाजले आणि त्याची तहान भागल्यावरच त्याला जंगलात सोडण्यात आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral) होत आहे.
पावसाळ्यात साप आपल्या बिळातून अनेकदा बाहेर येतात. अशावेळी सर्पमित्र त्यांना पुन्हा जंगलात सोडण्याचे काम करतात. असेचे दोन वेगवेगळ्या जागेवरुन पकडलेल्या दोन कोब्रा सापांना जंगलात सोडण्यात आले. मात्र त्यापूर्वी तहानलेल्या सापाला सर्पमित्रांनी बाटलीने पाणी पाजले. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात तुम्ही पाहू शकाल की, साप बाटलीतून पाणी पित आहे. (Snake Viral Video: दोन विषारी सापातील लढाई पाहून तुम्हालाही सुटेल थरकाप; पहा संपूर्ण व्हिडिओ)
पहा व्हिडिओ:
(हे ही वाचा: Viral Video: छोट्याशा खारूताईचा सापाने अडवला रस्ता, त्यानंतर दोघांमध्ये झालं जबरदस्त भांडण; पहा व्हिडिओ)
दरवर्षी उन्हाळात अनेक प्राणी पक्षी त्रासले जातात. यात पाण्यावाचून अनेकांचा मृत्यू होतो. त्यामुळे तहानलेल्या प्राण्यांना पाणी देण्याचे काम तरी आपण नक्कीच करु शकतो. दरम्यान, यापूर्वी देखील एक व्हिडिओ समोर आला होता त्यात किंग कोब्राला एक व्यक्ती बाटलीने पाणी पाजत होता. यासाठी त्याने सापाच्या फण्याच्या मधोमध हात धरला होता. हा व्हिडिओ पाहून लोक अचंबित झाले होते.