Viral Video: छोट्याशा खारूताईचा सापाने अडवला रस्ता, त्यानंतर दोघांमध्ये झालं जबरदस्त भांडण; पहा व्हिडिओ
खारूताई आणि सापामधील लढाई (Photo Credits: YouTube)

Viral Video: साप (Snake) आणि मुंगूस (Mongoose) यांच्यातील भांडणाचे व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. या दोघांच्या भांडणाचे बरेच मनोरंजक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु, आपण कधी साप आणि खारूताई (Squirrel) यांच्या दरम्यानची लढाई पाहिली आहे का? जर आपण या दोघांमधील लढाई पाहिली नसेल तर, आज आम्ही तुम्हाला साप आणि खारुताईमधील (Fight Between Snake And Squirrel) चकमकीचा एक व्हिडिओ दाखवणार आहोत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक साप एका छोट्या खारूताईचा रस्ता थांबवतो. त्यानंतर त्या दोघांमध्ये भांडण सुरू होते. व्हिडिओमध्ये खारूताई सापासोबत जबरदस्त भांडण करताना दिसत आहे. इतक्या मोठ्या सापापासून पळ काढण्याऐवजी ती त्याचा ठामपणे सामना करते.

हा यूट्यूब व्हिडीओ अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मधील असल्याचं म्हटलं जात आहे. व्हिडिओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की, एक खारूताई कुठेतरी जात आहे आणि तिचा मार्ग सापाने थांबवला आहे. त्यानंतर खारूताई सापावर हल्ला करते. त्यानंतर साप तिला दंश करण्याचा प्रयत्न करतो. यानंतर साप आणि खारूताईमध्ये भीषण लढाई सुरू होते, जी बराच काळ चालते. (वाचा -Moustache Bird Viral On Internet: मिशीवाल्या पक्षाचा फोटो इंटरनेटवर व्हायरल, लोकही म्हणतायत '‘मिशा असाव्यात तर या पक्षासारख्या')

व्हिडिओमध्ये पाहून असं वाटत की, साप खारूताईला चावेल. मात्र, तो असे करण्यास सक्षम नाही. खारूताई अत्यंत हुशारीने सापापासून दूर जाण्यासाठी तिच्या बुद्धिमत्तेचा वापर करते आणि काही वेळाने पुन्हा त्याच्यावर हल्ला करते. संपूर्ण व्हिडिओमध्ये खार सापांवर भारी पडल्याची दिसत आहे. अखेर साप अस्वस्थ होतो. त्यानंतर तो वेढा घालून एका जागेवर बसतो. त्यानंतर खारूताई संधी पाहून घटनास्थळापासून पळून जाते.