Snake Viral Video ( फोटो क्रेडिट्स: इन्स्टाग्राम)

Snake Viral Video: सापाचं नाव ऐकलं तरी लोकांना थरकाप सुटतो. परंतु, सापाच्या लढाया पाहणे किंवा चित्रित करणे ही मोठ्या धैर्याची बाब आहे. अशा स्वरुपाचे व्हिडिओ चित्रीत करणारे खूप कमी लोक आहेत. स्नेक ऑफ़ इंडिया (Snake of india) ने दोन सर्पांच्या जबरदस्त लढाईचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन विषारी साप लढाताना दिसत आहेत.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये वापरकर्त्याने लिहिलं आहे की, 'आमच्या बागेत साप आणि किंग कोब्रा यांच्यात लढाई झाली. ही लढाई पाहणे अतिशय आश्चर्यकारक आणि रोमांचकारी होते. माझ्या कुटुंबियांना ही लढाई पाहून आनंद झाला. हा एक अद्भूत काळ होता. मी जवळ जाऊन सापाला त्रास देऊ इच्छित नव्हतो. हा व्हिडिओ दिलीप हेगडे यांनी चित्रित केला आहे. (वाचा - सिंहिणी ने केली जंगली डुक्कराची शिकार; थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद (Watch Viral Video))

दोन दिवसांपूर्वी हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला होता, तेव्हापासून या व्हिडिओला आतापर्यंत 31 हजाराहून अधिक व्ह्यूज आणि 5 हून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. जर या दोन सापांच्या युद्धाचा व्हिडिओ पाहणं अद्भूत असेल तर, त्यांची थेट लढाई पाहणं किती आश्चर्यकारक असेल, असंही या यूजर्सने म्हटलं आहे.