सिंहिणी ने केली जंगली डुक्कराची शिकार; थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद (Watch Viral Video)
वाघिणीने केली जंगली डुक्कराची शिकार (Photo Credits: Twitter)

जंगलाचा राजा सिंह (Lion) सर्वाधिक खतरनाक प्राणी मानला जातो. शिकार करण्यात पटाईत असलेला हा प्राणी जराही दया-माया दाखवत नाही. सिंहांप्रमाणे सिंहिणी (Lionesses) देखील शिकार करण्यात माहिर असतात. अगदी काही वेळातच शिकार झालेला प्राणी मृत्यूच्या दारी पडतो. असाच सिंहिणीच्या शिकारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. यात सिंहिण जंगली डुक्कराची  (Wild Boar)  शिकार करत आहे. सिंहिणी डुक्कराच्या घरात घुसून खेचून त्याला बाहेर आणते आणि त्याचा फडशा पाडते. त्यात तिला इतर सिंहिणींचीही साथ लाभते.

थरकाप उडवणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. लाइफ एंड नेचर नावाने असलेल्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून जंगली डुक्कराच्या घरात घुसून सिंहिणीचा हल्ला असं कॅप्शन त्याला देण्यात आलं आहे. (Spider Kills King Cobra: स्पायडरने केली चक्क किंग कोबराची शिकार; विषारी सापाचा असा केला खात्मा, येथे पाहा संपूर्ण व्हिडिओ)

पहा व्हिडिओ:

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, जंगली डुक्कर आपल्या घरात जमिनीच्या आत लपला आहे. एक सिंहिणी त्याच्या घरात घुसते आणि बाकी सिंहिणी आजूबाजूला उभ्या राहतात. सिंहिणी डुक्कराला बाहेर खेचत आणते आणि त्याला घेऊन दूर पळू लागेत. परंतु, इतर सिंहिणी स्वत:चा हिस्सा घेण्यासाठी तिच्या मागे धावू लागतात. या झटापटीत जंगली डुक्कर स्वत:चा जीव वाचण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. परंतु, त्याचे सर्व प्रयत्न फोल ठरतात आणि सिंहिणींना त्यांची शिकार मिळते.