बाथरुम सेक्स करण्यास नकार दिल्याने पत्नीला मारहाण; पतीविरोधात गुन्हा दाखल
Representational Image. (Photo Credit: File Photo)

अहमदाबाद (Ahmedabad) येथील गोमतीपूर पोलीस ठाण्यात एका 19 वर्षीय महिलेने आपल्या पतीविरोधात तक्रार नोंदवली आहे. आपल्या तक्रारीत महिलेने आरोप केला आहे की, तिचा पती तिला बाथरुम सेक्स (Bathroom Sex) करण्यासाठी जबरदस्ती करतो. तसेच, बाथरुम सेक्सला नकार अथवा विरोध करता तिला त्याच्याकडून मारहाण केली जाते. आरोपी आणि तक्रारकर्ती महिला हे नवदाम्पत्य असून, अवघ्या चार महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बाछकुम सेक्ससाठी तिचा पती तिला जबरदस्तीने वॉशरुममध्ये घेऊन जातो. तसेच, पतीच्या कृत्याला नकार देताच तो तिला मारहाण करतो. अनेकदा तो तिच्यावर जबरदस्तीही करतो. (हेही वाचा, सेक्स करताना घाई नको; प्रणयापूर्वी जोडीदाराचे इरॉटिक पॉइंटस शोधून अशी करा सुरुवात)

आपल्या तक्रारीत या महिलेने पुढे म्हटले आहे की, केवळ पतीच नव्हे तर, साररचे लोकही तिला मारहाण करतात. तसेच, तिचा दीरही ती जेव्हा एकटी असते तेव्हा तिच्याशी छेडछाड करतो. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठीही तिचा छळ केल्याचा आरोप आपल्या तक्रारीत या महिलेने केला आहे. आजूबाजीच्या नातेवाइकांचे ऐकून सासरचे लोक आपल्याशी असे वागत असल्याचाही आरोप ही महिला करते. मारहाण आणि छळाच्या वेदना सहन न झाल्याने आपण घरातून बाहेर पडलो आणि माहेरी आल्यावर पोलिसात तक्रार दिली, असे या महिलेचे म्हणने आहे.