Hospital Staff Hits Patient: रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची वृद्ध रुग्णाला मारहाण; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद (Watch Video)
Hospital Staff Hits Patient (PC - X/@Sudanshutrivedi)

Hospital Staff Hits Patient: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. या व्हिडिओमधून अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येतात. सध्या सोशल मीडियावर असाचं एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रुग्णालयातील एक कर्मचारी रुग्णाला मारहाण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कर्मचारी एका वृद्ध रुग्णाला पोटात कोपर मारताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

प्राप्त माहितीनुसार बुधवारी (19 जून) रोजी ही घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजसह व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर समोर आला. या घटनेचे नेमके ठिकाण अद्याप समजलेले नाही आणि रुग्णाविरुद्ध क्रूर कृत्य करताना दिसलेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. त्याच्या या अमानुष कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, इंटरनेट वापरकर्त्यांकडून कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. (हेही वाचा -Fight Between Two Women Over Bus Seat: तेलंगणामध्ये बसच्या सीटवरून दोन महिलांमध्ये हाणामारी, व्हिडीओ व्हायरल)

पहा व्हिडिओ - 

व्हिडिओमध्ये, रुग्णाला मारहाण करणाऱ्या व्यक्तीने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा गणवेश परिधान केलेला दिसत आहे. हा कर्मचारी रुग्णाच्या जवळ येतो आणि पडदा बंद केल्यानंतर त्याच्या कोपराने रुग्णाच्या पोटात मारतो. वॉर्डात लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा त्याच्या नजरेस पडतो आणि नंतर तो घटनास्थळावरून पळून जातो.

प्रो. सुधांशू त्रिवेदी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, 'लोकांनी डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला आहे. पण इथे डॉक्टर सैतानाच्या रूपात आहेत. बघा,' असं कॅप्शन दिलं आहे. तथापि, इतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांचा दावा नाकारला असून व्हिडिओमध्ये दिसणारा माणूस डॉक्टर नसून वॉर्ड बॉय किंवा हॉस्पिटलचा अन्य कर्मचारी आहे.