अबु धाबीच्या मैदानावर कोलकाता नाईट राईडर्स विरुद्ध सामन्यात 168 धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपरकिंग्ज सुपर किंग्जला (CSK) 10 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. एका क्षणाला सामन्यात वरचढ असणारा चेन्नईचा संघ काही क्षणांत बॅकफूटवर फेकला गेला. या सामन्यात पराभूत झालेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांचा नेटिझन्सने सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेतला आहे. याच दरम्यान महेंद्रसिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) 5 वर्षीय मुलगी झिवाला (Ziva Dhoni) एका अज्ञात व्यक्तीने बलात्काराची धमकी दिली आहे. ही धमकी धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर देण्यात आली आहे.
आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने चांगली कामगिरी करता आलेली नाही. कोलकाता संघाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने धोनीला सामन्याच्या 17 व्या षटकात 11 धावांवर बाद केले होते. त्यानंतर चेन्नईच्या संघाला विजयासाठी 21 चेंडूत 39 धावांची गरज होती. मात्र, फलंदाजी करण्यासाठी मैदाना आलेल्या केदार जाधव 12 चेंडून केवळ 7 धावा करता आल्या. चेन्नईच्या संघाला अखेरच्या ओव्हरमध्ये 26 धावांची गरज होती. त्यावेळी केदार जाधवने पहिले दोन चेंडू निर्धाव खेळले आणि तिसऱ्या चेंडूवर एक धाव काढली. त्यानंतर स्ट्राईकवर आलेल्या रवींद्र जडेजाने राहलेल्या 3 चेंडूत 15 धावा ठोकल्या. त्याने केलेली फटकेबाजी संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरी ठरली आणि चेन्नईच्या संघाला 10 धावांनी पराभव पत्कारावा लागला. हे देखील वाचा- RR vs DC, IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सची अती घाई! जोफ्रा आर्चरने घेतल्या 3 विकेट, DCचे विजयासाठी रॉयल्ससमोर 185 धावांचे आव्हान
या हंगामात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने एकूण 6 सामने खेळले आहेत. यापैकी चेन्नईने 4 सामने गमावले आहेत. तर, 2 सामने जिंकले आहेत. चेन्नईचा संघ उद्या दुबई आतंरराष्ट्रीय मैदानात रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध आपला सातवा सामना खेळणार आहे. तसेच उद्याचा सामना चेन्नईच्या संघासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे. कारण, उद्याच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर चेन्नईच्या संघाला प्ले-ऑफ मध्ये स्थान मिळवणे अवघड जाण्याची शक्यता आहे.