
Pune Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका पुरुषाला मराठी बोलण्यास सांगितले असता तो हिंदी बोलण्याचा आग्रह धरत (Man Refuses to Speak Marathi) असल्याचे दिसत आहे. 'हिंदी ही बोलेंगे' (Hindi Hi Bolenge), असं हा व्यक्ती बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ पुण्यातील वाघोली परिसरातील डी-मार्ट स्टोअरमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तो पुरूष आणि त्याची पत्नी डी-मार्ट स्टोअरमध्ये चेकआउट रांगेत उभे आहेत. अचानक, दुसरा पुरूष त्याला मराठी बोलण्यास सांगतो. यावर हा व्यक्ती 'हिंदी ही बोलेंगे' (मी फक्त हिंदीतचं बोलणार), असं म्हणताना दिसत आहे.
जेव्हा दुसरा पुरूष त्याला पुन्हा मराठी बोलण्यास सांगतो तेव्हा तो म्हणतो, 'मराठी मे नही बोलेंगे (मी मराठी नाही बोलणार).' सोशल मीडियावर पोस्ट करा... हे चुकीचे आहे, असंही ही व्यक्ती बोलताना दिसत आहे. यावेळी तेथील लोकांनी या व्यक्तीला शांत राहण्यास सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. यावर मराठी बोलण्यास नकार देणारा व्यक्ती व्हिडिओ काढण्यास देखील नकार देत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. (हेही वाचा-Charkop Airtel Employee Refuses to Speak Marathi Viral Video: 'क्यू मराठी आना चाहिए?' असं उद्दामपणे विचारणार्या महिला कर्माचारीला कामावरून काढून टाकत एअरटेल ने जारी केला माफीनामा)
मराठी बोलण्यास नकार दिल्याने पुन्हा वाद -
Pune Viral Video
'Hindi Hi Bolenge': Man insists on speaking Hindi after being asked to speak Marathi at D-Mart in Wagholipic.twitter.com/w1yhi1qnH4
— Pune First (@Pune_First) March 13, 2025
आम्ही हिंदी भाषेतच बोलणार -
दरम्यान, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काहींनी म्हटले की जर एखादी व्यक्ती महाराष्ट्रात राहत असेल तर त्याला मराठी बोलता आले पाहिजे. तर काहींनी असा युक्तिवाद केला की, त्याला सर्वात चांगली समजणारी भाषा बोलण्याची परवानगी दिली पाहिजे. नक्की वाचा: Raj Thackeray On Bhaiyyaji Joshi's Remark On Language Of Mumbai: भय्याजी जोशी यांच्या विधानावर राज ठाकरे झाले आक्रमक; 'मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं' .
मराठी बोलण्यास नकार दिल्याने एअरटेल कंपनीतील कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल -
काही दिवसांपूर्वी एअरटेलच्या एका महिला कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये महिला कर्मचारी मराठी बोलण्यास आक्षेप घेत आहे. जेव्हा एक तरुण तिला मराठीत बोलायला सांगतो. यावर महिला कर्मचारी कथितपणे म्हणते की, मला मराठी येत नाही. तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्ही करू शकता.
या व्हायरल व्हिडिओनंतर मराठीत न बोलण्याचा हा मुद्दा विधानभवनातही गाजला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी एअरटेलवर टीका केली आणि म्हटले की, कंपनीने मराठी भाषेचा आदर केला पाहिजे. विशेषतः जेव्हा ती महाराष्ट्रात सेवा देते. ते म्हणाले की, मराठी ही महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा एक भाग आहे. कंपन्या आणि संस्थांनी स्थानिक भाषांना प्रोत्साहन देणे खूप महत्वाचे आहे. जर कंपनीला महाराष्ट्रात सेवा द्यायची असेल तर त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना मराठीत बोलण्यास सांगावे.